IPL 2024 : जितेश शर्मा याला पंजाब किंग्स टीमच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी

IPL 2024 Season 17th | आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या पूर्वसंध्येला अनेक उलथापालथ झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या 2 खेळाडूंना मोठी जबाबदारी मिळाली आहे.

IPL 2024 : जितेश शर्मा याला पंजाब किंग्स टीमच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी
| Updated on: Mar 21, 2024 | 7:33 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. यंदाच्या मोसमातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. मात्र सामन्याच्या काही तासांआधी चेन्नई सुपर किंग्सने मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला आहे. सीएसकेने महेंद्रसिंह धोनी याच्याकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला दिली आहे. ऋतुराजशिवाय महाराष्ट्राच्या आणखी एका खेळाडूला लॉटरी लागली आहे. महाराष्ट्राच्या एका खेळाडूला मोठी जबाबदारी मिळाली आहे.

पंजाब किंग्ससाठी खेळणाऱ्या जितेश शर्मा याला थेट उपकर्णधारपदाची सुत्रं देण्यात आली आहेत. आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन 17 व्या हंगामाच्या पूर्वसंध्येला सर्व संघाच्या कर्णधारांसह ट्रॉफीसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. जितेश शर्मा यामध्ये उपकर्णधार म्हणून हजर राहिला. तसेच जितेश उपकर्णधार म्हणून जबाबदारी पाहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर शिखर धवन हा पंजाबची कॅप्टन्सी करणार आहे.

जितेश शर्मा याची क्रिकेट कारकीर्द

जितेश शर्मा हा महाराष्ट्रातील अमरावतीचा. जितेश शर्मा याने पंजाब किंग्सकडून 2022 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. जितेशने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 26 सामन्यांमध्ये पंजाब किंग्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. जितेशने आयपीपएलमध्ये 24 डावांमध्ये 543 धावा केल्या आहेत. जितेशने या दरम्यान 44 सिक्स आणि 33 चौकार ठोकले आहेत. जितेशची 44 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. जितेशला याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. जितेशने 9 टी20आय सामन्यांमध्ये 100 धावा केल्या आहेत.

कर्णधारांचं फोटोशूट

पंजाब किंग्सच्या सामन्यांचं वेळापत्रक

दरम्यान पंजाब किंग्स 17 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. पंजाबचे हे चारही सामने संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होतील. पंजाब किंग्स या 4 पैकी एक सामना हा आपल्या घरच्या मैदानात अर्थात मोहालीत खेळणार आहे.

विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स , 23 मार्च, मोहाली

विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 25 मार्च, बंगळुरु

विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 30 मार्च, लखनऊ

विरुद्ध गुजरात टायटन्स, 4 एप्रिल, अहमदाबाद

आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्स टीम | शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा (उपकर्णधार) मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, सॅम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर, हरप्रीत भाटिया, विदवथ कावेरप्पा, शिवम सिंह, हर्षल पटेल, क्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिंस चौधरी आणि राइली रूसो.