AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RCB Head To Head : चेन्नई-बंगळुरु यांच्यापैकी वरचढ कोण?

IPL CSK vs RCB Head To Head : आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या 'रन'संग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमातील पहिल्याच सामन्यात गतविजेता चेन्नई आणि बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांपैकी वरचढ कोण आहे? जाणून घ्या

CSK vs RCB Head To Head : चेन्नई-बंगळुरु यांच्यापैकी वरचढ कोण?
| Updated on: Mar 21, 2024 | 5:20 PM
Share

आयपीएल 17 व्या मोसमाची सुरुवात 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्यकडे चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर फाफ डु प्लेसिस बंगळुरुचं कर्णधारपद सांभाळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकसेएक वरचढ खेळाडू आहेत. मात्र आरसीबीच्या तुलनेत सीएसके निश्चित वरचढ आहे. कारण सीएसकेने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यातील हेड टु हेड रेकॉर्ड कसा आहे? हे आपण जाणून घेऊयात.

आकडेवारी काय सांगते?

चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यात आयपीएलमधील पहिला सामना हा 28 एप्रिल 2008 रोजी झाला होता. तेव्हा आरसीबीने सीएसकेवर मात करत विजयी सुरुवात केली होती. तेव्हापासून ते आयपीएलच्या 16 व्या हंगामापर्यंत उभयसंघात एकूण 31 सामने खेळवण्यात आले आहेत. सीएसके या 31 सामन्यात वरचढ राहिली आहे. सीएसकेने 31 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 10 सामन्यात पलटवार करत विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

16 व्या हंगामात कोण जिंकलेला?

सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात 16 व्या हंगामात एकमेव सामना झाला होता. हा सामना 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. सीएसकेने या सामन्यात आरसीबीला विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीनेही जोरदार लढत दिली. मात्र आरसीबी विजय मिळवण्यात अपयशी ठरली. आरसीबीचा अवघ्या 8 धावांनी पराभव झाला होता.

आयपीएल 2024 साठी सीएसके टीम : ऋतुराज गायकवाड, (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.

टीम आरसीबी | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन) यश दयाल, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वायझॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.