षटकार मारणं थांबता कामा नये…! वैभव सूर्यवंशीने वादळी शतकी खेळीबाबत केला मोठा खुलासा
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यात युएईविरुद्ध 171 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी करण्यास सज्ज झाला आहे.

एसीसी मेन्स अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने युएईचा दारूण पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 433 धावा केल्या. तसेच युएईला 199 धावांवर रोखलं. या सामन्यात भारताने 234 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने 95 चेंडूत 14 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 171 धावा केल्या. आता वैभव सूर्यवंशी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रे याला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत वैभवने वादळी खेळीबाबत मोठा खुलासा केला. इतकंच काय मोठी खेळी करण्यात अपयश आल्याची खतंही वैभवने बोलून दाखवली. तर वैभवने पाकिस्तानसह इतर संघांना स्पष्ट इशारा दिला की, या स्पर्धेत जिंकण्याच्या उद्देश्याने उतरला आहे.
वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, ‘डोक्यात फक्त इतकंच होतं की मोठ्या खेळाडूसोबत ओपनिंग करण्याची संधी आहे. आयुष म्हात्रेसोबत.. मी यासाठी सदैव देवाचा ऋणी राहीन. दुसरं काही डोक्यात नव्हतं. फक्त एकच विचार करून उतरलो होती की 10 ते 12 षटकं मैदानात खेळेन. जेव्हा सेट होईल तेव्हा आपोआप धावा येतील. मी फक्त तेच अवलंबल होतं.’ वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळीबाबत सांगतात स्पष्ट केलं की, ‘कर्णधार बोलला होता की, षटकार थांबता कामा नये. मारण्याच्या नादात मी आऊट झालो.’ तेव्हा त्याला आयुषने रोखलं आणि काय करत होता ते सांगितलं. तेव्हा वैभव म्हणाला, ‘मी गोंधळलो. जर मी कर्णधाराचं ऐकलं असतं तर बाद झालो नसतो. 50 षटकं खेळलो असतो तर 300चं माहिती नाही पण मोठा स्कोअर झाला असता. मी फक्त पाकिस्तानविरुद्ध नाही तर पूर्ण स्पर्धेत चांगलं करायचं आहे.’
View this post on Instagram
एसीसी मेन्स अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा पुढचा सामना 14 डिसेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण प्रेशर असलेल्या सामन्यात वैभव कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. या सामन्यात विजयी झालेल्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हा सामना भारतसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्ताननंतर 16 डिसेंबरला मलेशियाशी लढणार आहे. त्यानंतर जेतेपदाचा सामना 21 डिसेंबर रोजी होणार आहे. वैभव सूर्यवंशीने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही अशीच कामगिरी केली होती. युएईविरुद्ध 42 चेंडूत 144 धावा केल्या होत्या.
