IPL 2026 : कॅमरुन ग्रीन मालमाल, पृथ्वी शॉ याची चांदी, मॉक ऑक्शनमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त भाव
IPL 2026 R Ashwin Mock Auction : मॉक ऑक्शनमधील अंदाज पाहता पृथ्वी शॉ याला यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या पदरात गेल्या मोसमात निराशा आली होती. पृथ्वीा तेव्हा अनसोल्ड राहिला होता.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला (IPL 2026) अजून काही महिने बाकी आहेत. या मोसमाची सुरुवात मार्चमधील शेवटच्या आठवड्यापासून होऊ शकते. त्याआधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे मिनी ऑक्शनकडे (Ipl 2026 Mini Auction) लागून आहे. येत्या मंगळवारी 16 ऑक्टोबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे. या मिनी ऑक्शनचं आयोजन हे अबुधाबीतील एतिहाद अरिना इथे करण्यात आलं आहे. ऑक्शनसाठी 1000 पेक्षा जास्त इच्छूक खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. मात्र बीसीसीआयने एकूण 10 फ्रँचायजींच्या संमतीने ऑक्शनसाठी एकूण 359 खेळाडूंची नावं अंतिम केली आहेत.
एकूण 10 फ्रँचायजींना एकूण आणि फक्त 77 खेळाडूंचीच गरज आहे. त्यामुळे 359 कोणत्या 77 खेळाडूंची ऑक्शनद्वारे निवड होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला घेण्यासाठी या 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या मिनी ऑक्शनआधी टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने त्याच्या यु्ट्यूब चॅनेलवर मॉक ऑक्शनचं आयोजन केलं होतं. या मॉक ऑक्शनमध्ये चाहत्यांनी 10 संघांसाठी बोली लावली. या मॉक ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला तगडा भाव मिळाला.
ग्रीनवर सर्वात मोठी बोली
कॅमरुन ग्रीन याला मॉक ऑक्शनमध्ये सर्वात जास्त भाव मिळाला. चेन्नई सुपर किंग्सने या मॉक ऑक्शनमधून ग्रीनसाठी 21 कोटी मोजले. या मॉक ऑक्शनमध्ये ग्रीनसाठी कोलकाता नाईट रायडर्सही आग्रही होती. मात्र ग्रीनला घेण्याच सीएसके यशस्वी ठरली. त्यामुळे मॉकमधील अंदाज पाहता कॅमरुन ग्रीनसाठी मिनी ऑक्शनमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
लियाम लिविंगस्टोनला तगडा भाव
इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोन याला मॉक ऑक्शनमध्ये तगडा भाव मिळाला. लिविंगस्टोन या मॉक ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरने लिविंगस्टोन याच्यासाठी 18.50 लाख रुपयांची बोली लावली. तसेच केकेआरने वेंकटेश अय्यर याच्यासाठी 17 कोटी 50 लाख रुपये मोजले.
पृथ्वीला 5 कोटींपेक्षा जास्त भाव
तसेच टीम इंडियातून गेली अनेक वर्ष बाहेर असलेला ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ मॉक ऑक्शनमध्ये सोल्ड ठरला. पृथ्वी गेल्या मोसमात अनसोल्ड राहिला होता. मात्र आता केकेआरने पृथ्वीसाठी मॉक ऑक्शनमध्ये 5.25 कोटी इतकी रक्कम मोजली. हे वरील सर्व आकडे मॉक ऑक्शनमधील आहेत. कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळू शकते? याचा अंदाज हा मॉक ऑक्शनद्वारे येतो. त्यामुळे आता मिनी ऑक्शनमध्ये या खेळाडूंना किती भाव मिळतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
