श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव, भक्तांसाठी कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचा पुण्यतिथी उत्सव दि. ५ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत गोंदवले येथे मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे कोठीपूजनाने उत्सवाचा शुभारंभ दि ५ डिसेंबरपासून झाला आहे.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव ५ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत गोंदवले येथे मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे कोठीपूजनाने उत्सवाचा शुभारंभ दि. ५ डिसेंबर रोजी झाला आहे. त्यांच्या श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव संपन्न होत आहे. १४ डिसेंबर या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी पुण्यकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन माध्यमाद्वारे होणार आहे.१४ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ ते ६.०५ भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
महाराजांचा जन्म आणि बालपण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्री एकनाथ महाराज आदी संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर होत. त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिध्द् झाले आहे.
श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती. अशा या सात्त्विक कुटुंबात रावजी आणि सौ . गीताबाई या जोडप्याच्या पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स.१९ फेब्रुवारी १८४५) या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्रीमहाराजांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ. राधाबाई यांना तर अत्यानंद झाला. पाळण्यात नाव गणपती असे ठेवले. हे गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्वप्रिय झाले. बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले. भगवद्भजनाची अतोनात आवड, एकपाठीपणा, तसेच अन्नदानाचे अतीव प्रेम आणि दीनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले.
पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. अध्यात्माची ओढ वाढतच होती, आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह गणूने गुरुशोधार्थ घरातून पलायन केले . पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला. अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला . त्यानंतर लवकरच आजी आणि आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले. पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली.
इकडे गुरुभेटीची तळमळ वाढतच होती. त्यांच्या ठिकाणी जन्मत:च अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती. श्री एकनाथ आणि श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. आणि अखेर, वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन स्वारीने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले, आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरु केले.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा ऑनलाईन पाहण्यासाठी या लिंकवर संपर्क करावा
