IPL 2024, PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबादने पंजाबसमोर विजयासाठी ठेवलं 183 धावांचं आव्हान

आयपीएल स्पर्धेतील 23 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 183 धावा केल्या. आता पंजाब किंग्स हे आव्हान गाठणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IPL 2024, PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबादने पंजाबसमोर विजयासाठी ठेवलं 183 धावांचं आव्हान
| Updated on: Apr 09, 2024 | 9:17 PM

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला बऱ्यापैकी कोंडीत पकडलं. फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध चांगली कामगिरी करणारे फलंदाज झटपट बाद होत गेले. नितीश रेड्डी सोडून एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. नितीश रेड्डीने एकहाती किल्ला लढवला. अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी आणि हेन्रिक क्लासेन साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावा केल्या. विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान पंजाब किंग्स संघ गाठतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सनरायझर्स हैदराबादला 27 धावा असताना पहिला धक्का बसला. ट्रेव्हिस हेड 21 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला एडन मार्करम आपलं खातंही खोलू शकला नाही. अर्शदीप सिंगने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर 16 धावा करून अभिषेक शर्मा बाद झाला.

नितीश रेड्डीने एकहाती किल्ला लढवला. नितीश रेड्डीने 37 चेंडूत 64 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकार मारले. राहुल त्रिपाठी 11, हेन्रिक क्लासेन 9, अब्दुल समद 25 धावा करून बाद झाले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 4 षटकात 29 धावा देऊन 4 गडी बाद केले. हर्षल पटेलने 4 षटकात 30 धावा देत 2 गडी, सॅम करनने 4 षटकात 2 गडी बाद करत 41 धावा दिल्या. तर कगिसो रबाडाने 4 षटकात 32 धावा देत एक गडी बाद केला. हरप्रीत ब्रार पंजाबसाठी महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात एकही गडी बाद केला नाही. तसेच 12 च्या सरसरीने 48 धावा दिल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन