IPL 2024 Points Table : हैदराबादला विजयानंतर मोठा फायदा, मुंबईला फटका
SRH vs MI 8th Match of Season 17th IPL : पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनराजयर्स हैदराबादला दुसऱ्या सामन्यात आपला पहिला विजय मिळवण्यात यश आलं. तर मुंबई दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरली. हैदराबादला बंपर फायदा झालाय. तर मुंबईचा बँडबाजा वाजलाय.

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. हंगामातली आठव्या सामन्यात मुंबईसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान होतं. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात हैदराबादने या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात करत पहिला विजय मिळवला. हैदराबादला या विजयानंतर मोठा फायदा झाला आहे. तर मुंबईला मोठा फटका बसला आहे. या दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना होता. मात्र हैदराबाद विजयी खातं उघडण्यात यशस्वी ठरली.
हैदराबादची मोठी उडी
या 8 व्या सामन्याआधी हैदराबाद आणि मुंबई दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी होते. नेट रनरेटचा फरक सोडला तर दोन्ही संघांची स्थिती कायम होती कारण पराभवाने झालेली सुरुवात. त्यामुळे दोन्ही संघांवर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा दबाव होता. मात्र यात हैदराबाद यशस्वी ठरली. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 278 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 246 धावांवर रोखत 31 धावांनी मात केली.
हैदराबादला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये
4 स्थानांचा मोठा फायदा झाला आहे. तसेच नेट रनरेटमध्ये सुधार झालाय. हैदराबादने सातव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईची आठव्या क्रमांकावरुन थेट नवव्या स्थानी घसरण झाली आहे. हैदराबादचा नेट रन रेट हा सामन्याआधी -0.200 असा होता. तर मुंबईची नेट रनरेटबाबतची स्थिती ही -0.300 अशी होती. हैदराबादचा विजयानंतर आता नेट रनेरट हा 0.675 इतका झाला आहे. तर मुंबईची आणखी वाईट स्थिती झाली आहे. मुंबईचा नेट रनरेट हा -0.925 असा झाला आहे.
| संघ | सामने | विजय | पराजय | नेट रनरेट | गुण |
|---|---|---|---|---|---|
| राजस्थान रॉयल्स | 3 | 3 | 0 | +1.249 | 6 |
| कोलकाता नाईट रायडर्स | 2 | 2 | 0 | +1.047 | 4 |
| चेन्नई सुपर किंग्स | 3 | 2 | 1 | 0.976 | 4 |
| गुजरात टायटन्स | 3 | 2 | 1 | -0.738 | 4 |
| सनरायझर्स हैदराबाद | 3 | 1 | 2 | +0.204 | 2 |
| लखनऊ सुपर जायंट्स | 2 | 1 | 1 | 0.025 | 2 |
| दिल्ली कॅपिटल्स | 2 | 1 | 2 | -0.016 | 2 |
| पंजाब किंग्स | 3 | 1 | 2 | 0.337 | 2 |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 3 | 1 | 2 | -0.711 | 2 |
| मुंबई इंडियन्स | 3 | 0 | 3 | -1.423 | 0 |
हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.
मुंबई प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि क्वेना माफाका.
