IPL 2024, RCB vs SRH : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने कौल, फलंदाजी घेत कर्णधार फाफ म्हणाला..

| Updated on: Apr 25, 2024 | 7:10 PM

आयपीएल स्पर्धेतील 41वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. आरसीबीसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

IPL 2024, RCB vs SRH : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने कौल, फलंदाजी घेत कर्णधार फाफ म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापूर्वीचा सामना सनरायझर्स हैदराबादने 25 धावांनी जिंकला होता. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 287 धावा केल्या आणि विजयासाठी 288 धावांचं आव्हान दिलं. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 262 धावा करून शकला. आता पुन्हा एकदा हे दोन संघ भिडणार असून आरसीबीसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाल्यास स्पर्धेतील आव्हान खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. त्यामुळे आरसीबीचा संघ विजयासाठी पूर्ण जोर लावणार यात शंका नाही. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याने धावांचा डोंगर रचला जावू शकतो. दरम्यान नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. कर्णधार फाफ डु प्लेसिसने फलंदाजी करणार असल्याचं सांगितलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाले की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्हाला असे वाटते की आमचे चाहते आमच्यासोबत सर्वत्र येतात. ही मुलं काही आश्चर्यकारक क्रिकेट खेळत आहेत, आशा आहे की आम्ही त्यांच्यावर काही धावा करून दबाव आणू शकू. शेवटच्या सामन्यात आम्ही खूप संघर्ष केला. आम्ही तोच संघ घेऊन खेळणार आहोत..”

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “येथे परत येणे खूप छान आहे. माझे येथे पहिले वर्ष आहे. आमची जर्सी परिधाने केलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे, एक चांगले ठिकाण वाटते. आम्हाला तशीच फलंदाजी करायची आहे. गोलंदाजीची बाजू म्हणून आम्हाला लवकर जुळवून घ्यावे लागेल. उनाडकट ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संघात घेतलं आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर्स: सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विषक, स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, ट्रॅव्हिस हेड.