
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. मुंबईने प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. ल्यूक वूड दुखापतीमुळे या सामन्याचा भाग नसणार आहे. त्याच्या जागी 17 वर्षीय युवा गोलंगाज क्वेफा मफाका याला संधी दिली आहे. या सामन्याआधी मुंबईचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याचा सचिन तेंडुलकरने सन्मान केला.
रोहितसाठी हैदराबाद विरुद्धचा हा सामना ऐतिहासिक असा आहे. रोहित शर्मा याचा हैदराबाद विरुद्धचा सामना हा त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 245 वा सामना आहे. रोहितचा त्यापैकी हा मुंबईसाठीचा 200 वा सामना आहे. रोहित मुंबईसाठी 200 वा सामना खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या अविस्मणीय क्षणी मुंबईच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सचिन तेंडुलकरने रोहितचा खास सन्मान केला. सचिनने यावेळेस रोहितला मुंबई इंडियन्सची ‘200’ क्रमांकाची खास जर्सी दिली. तसेच यावेळेस इतर सहकाऱ्यांनीही रोहितला शुभेच्छा दिल्या.
रोहित शर्मा याचा मुंबईसाठी 200 वा सामना
A special moment to mark a landmark occasion 😃
Rohit Sharma is presented with a special commemorative jersey by none other than the legendary Sachin Tendulkar on the occasion of his 200th IPL Match for @mipaltan 👏👏#TATAIPL | #SRHvMI | @ImRo45 | @sachin_rt pic.twitter.com/iFEH8Puvr7
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
रोहितने मुंबईसाठी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. रोहितने 2013 ते 2023 पर्यंत मुंबईचं नेतृत्व केलं. रोहितने या 11 वर्षांमध्ये मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.
हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.
मुंबई प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि क्वेना माफाका.