
सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विदय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 9.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने धुव्वादार बॅटिंग करत हैदराबादला 10 ओव्हरच्या आतच विजय मिळवून दिला. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झालाय. तसेच हैदराबादने प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलंय.
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडी मैदानात येताच विस्फोटक फलंदाजी केली आणि विजय मिळवूनच विश्रांती घेतली. या दोघांनी पावर प्लेमध्येच 100 धावा जोडला. त्यानंतर दोघांनी आपला दांडपट्टा कायमच ठेवला. या दोघांनी 9.4 ओव्हरमध्ये 167 धावांची नाबाद सलामी विजयी भागीदारी केली. अभिषेक शर्मा याने 6 सिक्स आणि 8 फोरसह 267.86 च्या स्ट्राईक रेटने 75 धावांची नाबाद खेळी केली. तर ट्रेव्हिस हेड याने 30 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 8 फोरसह 296.67 च्या स्ट्राईक रेटने 89 रन्स केल्या. या दोघांनी लखनऊच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
त्याआधी लखनऊने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अडखळत झालेल्या सुरुवातीमुळे लखनऊची 4 बाद 66 अशी स्थिती झालेली. मात्र त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी या जोडीने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यामुळे लखनऊला 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 165 धावांपर्यंत मजल मारता आली. लखनऊकडून आयुष बदोनी याने सर्वाधिक नाबाद 55 आणि निकोलस पूरनने 48* रन्स केल्या. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हैदराबादचा धमाकेदार विजय
WHAT. A. CHASE 🧡
A 🔟-wicket win for @SunRisers with more than 🔟 overs to spare!
Scorecard ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/kOxzoKUpXK
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.