SRH vs PBKS : पंजाबच्या विजयासाठी राजस्थानची प्रार्थना, हैदराबादसाठी सुवर्ण संधी, कोण यशस्वी होणार?

IPL 2024 SRH vs RR : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याच्या निकालाकडे राजस्थान रॉयल्सचं लक्ष असणार आहे. पंजाब किंग्सचा विजय हा राजस्थानसाठी फायदेशीर असणार आहे. कसं ते जाणून घ्या.

SRH vs PBKS : पंजाबच्या विजयासाठी राजस्थानची प्रार्थना, हैदराबादसाठी सुवर्ण संधी, कोण यशस्वी होणार?
srh vs pbks rr ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 18, 2024 | 4:55 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 19 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या दोन्ही संघांचा या हंगामातील हा अखेरचा सामना आहे. तसेच दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधी 9 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर 2 धावांनी विजय मिळवला होता. पंजाबचं या हंगामातील आव्हान संपु्ष्टात आलं आहे. त्यामुळे पंजाबकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा वचपा घेण्यासह हंगामाचा शेवट गोड करण्याची दुहेरी संधी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतरही हा सामना महत्त्वाचा आहे. तसेच हैदराबाद आणि पंजाबचा सामन्याचा निकालावर राजस्थानचं भवितव्य अवलंबून असणार आहे, कसं ते जाणून घेऊयात.

पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार, केकेआर, राजस्थान आणि हैदराबाद पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. केकेआरच्या नावे 19, राजस्थानचे 16 आणि हैदराबादचे 15 पॉइंट्स आहेत. तिन्ही संघांचा साखळी फेरीतील प्रत्येकी 1-1 सामना बाकी आहे. आता हैदराबादने पंजाब विरुद्धचा सामना जिंकल्यास, त्यांचे 17 पॉइंट्स होतील. हैदराबादने हा सामना जिंकल्यास राजस्थानला दुसरं स्थान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत केकेआरवर विजय मिळवावा लागेल. कारण साखळी फेरीतीचा शेवट दुसऱ्या स्थानी केल्यास फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोनदा संधी मिळेल. त्यामुळे दुसऱ्या स्थानाच्या हिशोबाने हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्याचा निकाल निर्णायक ठरणार आहे.

पंजाबने हैदराबादवर विजय मिळवला तर राजस्थान केकेआर विरुद्ध पराभूत झाली तरी फरक पडणार नाही. मात्र हैदराबादने विजय मिळवल्यास राजस्थानला कोणच्याही परिस्थितीत केकेआरवर विजय मिळवावा लागेल. त्यामुळे आता या जर तरच्या लढाईत कोण बाजी मारतं आणि दुसरं स्थान मिळवतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

पंजाब किंग्स टीम : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.