IPL 2024 SRH vs RCB Live Streaming : आरसीबीसमोर हैदराबादचं आव्हान, पराभवाची मालिका थांबवणार का?

| Updated on: Apr 24, 2024 | 5:12 PM

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही या आयपीएलच्या 17 व्या मोसमातील दुसरी वेळ आहे.

IPL 2024 SRH vs RCB Live Streaming : आरसीबीसमोर हैदराबादचं आव्हान, पराभवाची मालिका थांबवणार का?
RCB vs SRH IPL 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. फाफ डु प्लेसीस आरसीबीची धुरा सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्सकडे एसआरएचची सूत्र आहेत. हैदराबादचा हा आठवा आणि आरसीबीचा नववा सामना आहे. हैदराबादने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीला 9 पैकी फक्त 1 सामन्यातच विजयी होता आलं आहे. त्यामुळे आरसीबीचं जवळपास आव्हान हे संपुष्टात आलंय. मात्र आरसीबीचा प्रयत्न विजयी ट्रॅकवर परतण्याचा असणार आहे.

आरसीबी-हैदबाद या दोन्ही संघांची या हंगामात एकमेकांविरुद्ध येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी उभयसंघात 15 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा हैदराबादला 287 धावा करुनही अवघ्या 25 धावांनी विजय मिळाला. हैदराबादने आरसीबीला त्यांच्या होम ग्राउंडमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे आता आरसीबीकडे हैदराबादला पराभूत करत विजयी ट्रॅकवर परतण्यासह पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी आहे.

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना गुरुवारी 25 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना फुकटात मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डू प्लेसिस (कर्णधार) यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरून , मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.