IPL 2024, SRH vs RCB : आरसीबी हैदराबादला पराभूत करणार का? या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

| Updated on: Apr 24, 2024 | 4:09 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील स्थिती एकदम जबरदस्त आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील ते..

IPL 2024, SRH vs RCB : आरसीबी हैदराबादला पराभूत करणार का? या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुला 25 धावांना पराभूत केलं होतं. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची बाजू एकदम भक्कम आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. बंगळुरुला 8 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. हैदराबादने या स्पर्धेत तीनवेळा 250 अधिक धावसंख्या केली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यात हैदराबादने 13 वेळा, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वेळा विजय मिळवला आहे. एका सामना निकालाविना सुटला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून सात, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 4 खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड सर्वोत्तम फलंदाज ठरू शकतो. तर गोलंदाजीत टी नटराजन हा सर्वोत्तम गोलंदाज ठरू शकतो. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स आणि टी नटराजन चांगले खेळाडू ठरतील. तर बंगळुरुकडून फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स आणि रीसी टोपले यांच्यावर मदार असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा डोंगर रचला जावू शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. दवबिंदू अधिक प्रमाणात पडत असल्याचं दिसल्यास गोलंदाजी स्वीकारली जाईल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यूके), नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
इम्पॅक्ट प्लेयर्स : टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेयर्स : सुयश प्रभुदेसाई.