CSK vs MI : मुंबईच्या पराभवाची मालिका यंदाही कायम, चेन्नईची विजयी सलामी, पलटणवर 4 विकेट्सने मात

Chennai Super Kings vs Mumbai Indians Match Result IPL 2025 : चेन्नईने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात करत विजयी सलामी दिली आहे. रचीन रवींद्र आणि कॅप्टन ऋतुराज या जोडीने चेन्नईच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

CSK vs MI : मुंबईच्या पराभवाची मालिका यंदाही कायम, चेन्नईची विजयी सलामी, पलटणवर 4 विकेट्सने मात
Rachin Ravindra and Ruturaj Gaikwad CSK vs MI IPL 2025
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 23, 2025 | 11:33 PM

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात(IPL 2025) आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नईने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 5 बॉलआधी पूर्ण केलं. चेन्नईने 19.1 ओव्हरमध्ये 158 धावा केल्या. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र या दोघांनी चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. चेन्नईसाठी या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रचीनने नाबाद 65 धावा केल्या. तर ऋतुराजने 53 धावांची खेळी केली.

चेन्नईची बॅटिंग

ऋतुराजने 26 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा याने 17 धावा जोडल्या. शिवम दुबे 9, सॅम करन 4, दीपक हुड्डा 3 आणि राहुल त्रिपाठी याने 2 धावा केल्या. तर रचीन रवींद्र याने चेन्नईसाठी 45 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 65 रन्स केल्या. रचीनने सिक्स ठोकत चेन्नईला विजयी केलं. तर महेंद्रसिंह धोनी झिरोवर नॉट आऊट परतला. मुंबईसाठी युवा विघ्नेश पुथुर याने तिघांना बाद केलं. तर विल जॅक्स आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबई सलग 13 व्या वर्षीही अपयशी

दरम्यान मुंबईने यासह गेल्या 12 वर्षांपासूनची पराभवाची मालिका यंदाही कायम राखली. मुंबईला सलग 13 वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने याआधी 2012 साली पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. मात्र तेव्हापासून मुंबईला विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे पलटणच्या चाहत्यांना विजयी सुरुवात व्हावी, यासाठी 2026 या वर्षाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

रचीन रवींद्रचा विजयी षटकार

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.