
आयपीएल स्पर्धेत खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. कारण जगातील सर्वात श्रीमंत लीग पैकी एक आहे. येथे खेळताना खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा वर्षाव होतो. इतकंच काय तर दिग्गज खेळाडूंच्या सान्निध्यात बरंच काही शिकता येतं. त्यामुळे आयपीएलची भूरळ पडल्याशिवाय राहात नाही. आयपीएलची प्रसिद्धी आणि गेल्या वर्षांपासून खेळण्याची इच्छा पूर्ण झाली आणि क्रिकेटपटू कॉर्बिन बॉशने पाकिस्तानला ठेंगा दाखवला आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून ऑफर मिळताच त्याने पाकिस्तान प्रीमियर लीगला पाठ दाखवली. तसेच तडकाफडकी करार मोडून काढला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर बंदी लादली तसेच दंडही ठोठावला. पण आता त्याचा याने काहीच फरक पडत नसल्याचं दिसत आहे. कारण कॉर्बिन बॉशने ज्या पद्धतीने आयपीएलमध्ये खेळ केला आहे ते पाहता त्याच्यासाठी पाकिस्तानमध्ये जे काही घडलं ते महत्त्वाचं नाही.
दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. 27 एप्रिलला आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. या सामन्यात बॉशने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 10 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार मारत 20 धावा केल्या. तर गोलंदाजीत 4 षटकात टाकली आणि 26 धावा देत एक गडी बाद केला. यावेळी इकोनॉमी रेट हा 6.50 इतका होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉशवर कारवाई करत एक वर्षाची बंदी आणि दंड ठोठावला आहे. कॉर्बिन बॉश पीएसएल 2025 मध्ये पेशावर झल्मी संघात सामील झाला होता. पण आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळताच त्याने पाकिस्तान सुपर लीगचा करार नाकारला. लिझाड विल्यम्सच्या जागी मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशचा समावेश संघात केला आहे.
कॉर्बिन बॉश हा पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं अकाली मृत्यू झाला होता. तेव्हा त्याच्या मृत्यूचं कारण हे गुइलेन-बॅरे सिंड्रोम असं सांगितलं गेलं. पण कॉर्बिनच्या बहिणीने मृत्यूचं कारण हे नसल्याचं सांगत आक्षेप घेतला. त्यानंतर 18 महिन्यांनी कॉर्बिनचे वडील टर्टियस बॉश यांचा मृतदेह थडग्यातून काढला. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी केली असता विष आढळून आलं. कॉर्बिन बॉशच्या वडिलांना कोणी विष दिले हे निश्चित होऊ शकले नाही. 2000 साली त्याच्या वडिलांचे निधन झाले.