
पंजाब किंग्सने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होम टीम चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने पंजाबला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 6 विकेट्स गमावून आणि 2 चेंडूंआधी पूर्ण केलं. पंजाबने 19.4 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह या दोघांनी बॅटिंगने पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबने यासह आयपीएल 2025 मधील एकूण सहावा विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा तर एकूण आठवा पराभव ठरला. तसेच चेन्नईची ही घरच्या मैदानात पराभूत होण्याची पाचवी वेळ ठरली. चेन्नईचं या पराभवासह आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. चेन्नई या हंगामातील साखळी फेरीतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली.
पंजाबचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने 19 व्या ओव्हरमध्ये हॅटट्रिकसह एकूण 4 विकेट्स घेत चेन्नईचं कंबरडं मोडलं. चहलच्या या ओव्हरमुळे चेन्नईला 200 पारही मजल मारता आली नाही. चेन्नईचं 19.4 ओव्हरमध्ये 194 धावांवर पॅकअप झालं. चेन्नईसाठी सॅम करन याने सर्वाधिक 88 धावाचं योगदान दिलं. तर डेवाल्ड ब्रेव्हिस याने 3 धावा जोडल्या. या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही विशेष करता आलं नाही.
चेन्नईच्या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तिघे दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पंजाबकडून चहल व्यतिरिक्त अर्शदीप सिंह आणि मार्को यान्सेन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अझमतुल्लाह आणि हरप्रीत ब्रार या दोघांनी 1-1- विकेट घेतली.
पंजाबचा 4 विकेट्सने विजय
Hat-trick 👌
Powerful start with the bat 🔥
Captain’s knock 🫡The Battle of Kings goes the @PunjabKingsIPL way again this season ❤
Scorecard ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Yk1SOZOzip
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
पंजाबकडून 191 धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर आणि प्रभसिमर सिंह या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 41 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. तर प्रभसिमरन याने 36 बॉलमध्ये 3 सिक्स आणि फोरसह 54 रन्स केल्या. प्रियांश आर्या आणि शशांक सिंह या दोघांनी प्रत्येकी 23-23 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी एकेरी धावा करत चेन्नईला विजयी केलं. चेन्नईकडून खलील अहमद आणि मथीशा पथीराणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि नूर अहमद या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.