
रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीनंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या या त्रिकुटाने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्ससमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 228 रन्स केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही चौफेर फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. तर अखेरच्या क्षणी हार्दिकने मोठे फटके मारले.त्यामुळे मुंबईला 220 पार मजल मारता आली. मुंबईच्या फलंदाजानंतर आता गोलंदाज कशी कामगिरी करतात? याची उत्सकूता चाहत्यांना आहे.
हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो सलामी जोडी मैदानात आली. गुजरातला ही सलामी जोडी फोडण्याची 2 वेळा संधी मिळाली. मात्र गुजरातने ही संधी गमावली. गुजरातने रोहितला 3 आणि 12 धावांवर जीवनदान दिलं. रोहितने त्याचा पूर्ण फायदा घेतला. रोहित आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने मुंबईला कडक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 84 धावांची भागीदारी केली. जॉनी त्यानंतर आऊट झाला. जॉनीने 22 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 47 रन्स केल्या.
त्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार या दोघांनी मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात फटके लगावले आणि गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहित आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 59 रन्स केल्या. त्यानंतर सूर्यकुमार 20 चेंडूत 3 सिक्स आणि 1 फोरसह 33 रन्स करुन आऊट झाला. सूर्यानंतर तिलक मैदानात आला. रोहित आणि तिलकने तिसऱ्या विकेटसाठी 22 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली. रोहितला शतक करण्याची संधी होती. मात्र रोहित शतकापासून 19 धावांनी दूर राहिला.
गुजरात 229 रन्स करणार?
Innings break!
A spectacular batting performance from @mipaltan as they post 228/5 in the #Eliminator🔥
Will @gujarat_titans chase this down? 🤔
We will find out 🔜
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/d8rFOmWjnq
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
रोहितने 50 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 फोरसह 81 रन्स केल्या. रोहित शर्मा याच्यानंतर तिलक वर्मा देखील माघारी परतला. तिलकने 11 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 25 धावला जोडल्या. नमन धीर याने 6 बॉलमध्ये 1 सिक्ससह 9 रन्स केल्या. तर कर्णधार हार्दिक पंड्या याने फिनिशिंग टच दिला. हार्दिकने 9 बॉलमध्ये 244.44 च्या स्ट्राईक रेटने 3 खणखणीत सिक्ससह नॉट आऊट 22 रन्स केल्या.
तर गुजरात टायटन्सकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त तिघांनाच विकेट घेता आल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. मात्र दोघेही महागडे ठरले. दोघांनी 10 पेक्षा अधिकच्या इकॉनॉमीने धावा दिल्या. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेतली. तर राशिद खान, जेराल्ड कोएत्झी आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांना विकेट घेता आली नाही.