
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका अप्रतिम झेलचं दर्शन घडलं. आरसीबीच्या फिलिप सॉल्टने पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्यचा अप्रतिम झेल पकडला. हा चेंडू सीमेपार जाईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही. उलट प्रियांशला बाद होत तंबूत परतावं लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्सकडून सलामीला प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या ही जोडी आली. या जोडीने सावध पण चांगल्या खेळीला सुरुवात केली होती. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. तिसरं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंग चुकला झेल शेफर्डच्या हातात होता. पण त्याला काही पकडता आला नाही. त्यामुळे आरसीबीवर दडपण वाढलं होतं. पण चूक पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुधारली. यावेळी प्रभसिमरन नाही तर प्रियांशची विकेट मिळाली.
प्रियांश आर्याने शॉर्ट लेंथ बॉलवर सीमेपार चेंडू मारला. पण षटकार जाईल असं वाटत असताना वाऱ्याच्या वेगाने फिलिप सॉल्ट आला आणि षटकाराच्या चेंडू पकडला. स्वत: बाहेर जात असताना चेंडू आत फेकला आणि पुन्हा पकडला. त्याच्या या झेलचं कौतुक होत आहे. कारण अंतिम सामन्यात अशाप्रकारे झेल पकडणं हे संघाच्या फायदाचं असतं. प्रियांश आर्या आरसीबीसाठी डोकेदुखी ठरत होता. प्रियांशने 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या.
A GAME CHANGING CATCH BY SALT 🥶 pic.twitter.com/SxdpRgA4Se
— Johns. (@CricCrazyJohns) June 3, 2025
दरम्यान, आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात जेतेपदाची मोठी लढत आहे. कारण दोन्ही संघांनी कधीच जेतेपद मिळवलेलं नाही. त्यात 190 धावांचं आव्हान तसं पाहायला गेलं तर सोपं आहे. त्यामुळे पंजाब किंग्स हे आव्हान गाठणार का? की आरसीबी रोखणार हे महत्त्वाचं आहे. जो संघ अंतिम सामन्यात जिंकेल त्याचं 17 वर्षांचं अपुरं स्वप्न पूर्ण होणार आहे.