गुजरात टायटन्स आणि आरसीबीचं टेन्शन वाढलं, ईसीबीच्या निर्णयामुळे दिग्गज खेळाडू मुकणार?

आयपीएल 2025 स्पर्धेचा उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धक्का दिला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे-टी मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. यात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स आणि आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

गुजरात टायटन्स आणि आरसीबीचं टेन्शन वाढलं, ईसीबीच्या निर्णयामुळे दिग्गज खेळाडू मुकणार?
गुजरात टायटन्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 13, 2025 | 7:59 PM

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्याने संघ बांधणीसाठी पुढाकार घेतला असून हॅरी ब्रूककडे सर्व फॉर्मेटची जबाबदारी दिली आहे. तसेच झिम्बाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी, तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पावलं उचलली आहेत. जोस बटलरने कर्णधारपद सोडलं आणि हॅरी ब्रूकला त्याच्या जागी धुरा सोपवली. इंग्लंड संघासाठी हॅरी ब्रूकने आयपीएल 2025 स्पर्धेत भाग घेतला नाही. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका 29 मे ते 3 जून दरम्यान आहे. त्यानंतर 6 जूनला टी20 मालिका सुरु होईल. 10 जूनला शेवटचा सामना खेळवला जाईल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 29 मे ते 3 जून दरम्यान वनडे मालिका असल्याने आयपीएलवर परिणाम होणार आहे. कारण आयपीएल खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंची इंग्लंडने संघात निवड केली आहे.

जोस बटलर ( गुजरात टायटन्स ), जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स), विल जॅक्स (मुंबई इंडियन्स) आणि जेकब बेथेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) यांचा दोन्ही संघात समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फिल साल्ट फक्त 6 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 मालिकेत सहभागी होईल. त्यांची उपलब्धता 3 जून रोजी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यावर अवलंबून असेल. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली आहे. कारण 29 मे पासून आयपीएल प्लेऑपचे सामने सुरु होतील. त्यामुळे या संघांचं टेन्शन वाढलं आहे. यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील अशीच स्थिती आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत या संघांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड संघ

एकदिवसीय संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ.

टी20 संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल साल्ट, ल्यूक वूड.