KKR vs RCB : 4 षटकार-6 चौकार, कर्णधार Ajinkya Rahane याचा धमाका, पहिल्याच सामन्यात तुफानी फिफ्टी

Ajinkya Rahane Fifty KKR vs RCB IPL 2025 : अजिंक्य रहाणे याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात आरसीबीविरुद्ध विस्फोटक खेळी करत झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे.

KKR vs RCB : 4 षटकार-6 चौकार, कर्णधार Ajinkya Rahane याचा धमाका, पहिल्याच सामन्यात तुफानी फिफ्टी
Ajinkya Rahane Fifty KKR vs RCB Ipl 2025
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 22, 2025 | 8:49 PM

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पहिल्याच सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. रहाणेने ईडन गार्डनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात (KKR vs RCB) झंझावाती खेळी करत वादळी अर्धशतक झळकावलं आहे. रहाणेने अर्धशतकी खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिसर्‍या स्थानी आलेल्या रहाणेने मैदानात येताच फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि नवव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर षटकार ठोकत फिफ्टी पूर्ण केली.

पहिला सामना पहिलं अर्धशतक

बंगळुरुकडून सूयश शर्मा केकेआरच्या डावातील नववी ओव्हर टाकायला आला. सूयशने पहिला बॉल वाईड टाकला. त्यामुळे सुयशला पुन्हा बॉल टाकावा लागला. रहाणे 45 धावांवर खेळत होता. रहाणे याने या बॉलवर खणखणीत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेने अवघ्या 25 बॉलमध्ये 204 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेने या अर्धशतकी खेळीत फक्त 3 धावा धावून घेतल्या. तर इतर 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. रहाणेच्या अर्धशतकी खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.

कर्णधार म्हणून पहिलं अर्धशतक

दरम्यान रहाणेचं हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील एकूण 31 वं अर्धशतक ठरलं. तसेच रहाणेचं केकेआरचा कर्णधार म्हणून हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.

दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

दरम्यान केकेआरने पहिली विकेट अवघ्या 4 धावांवर गमावली. सुनील नारायण आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात आली. डी कॉकने 4 धावा केल्या आणि आऊट झाला.त्यानंतर कर्णधार रहाणेने सुनीलसह दुसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान रहाणे आणि सुनील या दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत स्फोटक फलंदाजी केली.तसेच त्यानंतरही टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.

कर्णधार रहाणेचं षटकारासह अर्धशतक

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड आणि यश दयाल.