IPL 2025 KKR vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान, केकेआर जिंकणार?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Streaming: कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघ 18 आपला तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

IPL 2025 KKR vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान, केकेआर जिंकणार?
KKR vs SRH Live Streaming Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2025 | 10:23 PM

आयपीएलच्या 15 व्या सामन्यात (IPL 2025) गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध गतउपविजेता सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

केकेआरने पराभवाने सुरुवात केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यात पुन्हा पराभव झाला. तर हैदराबादने विजयी सुरुवातीनंतर सलग दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे हैदराबादसमोर पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना केव्हा?

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना गुरुवारी 3 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना कुठे?

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना ईडन्स गार्डन, कोलकातामध्ये खेळवण्यात येणार आहे.

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

केकेआर विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह सामना जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.