IPL 2025 : केकेआर का ठरतेय फ्लॉप? गतविजेत्या संघाला काय झालंय? जाणून घ्या 3 कारणं

IPL 2025 Kolkata Knight Riders : गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. केकेआरने या 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. तर एकच सामना जिंकता आला आहे. केकेआरचे खेळाडू आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत.

IPL 2025 : केकेआर का ठरतेय फ्लॉप? गतविजेत्या संघाला काय झालंय? जाणून घ्या 3 कारणं
KKR Flag Ipl
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 03, 2025 | 6:30 PM

कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली. केकेआरची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची 2014 नंतर पहिली तर एकूण तिसरी वेळ ठरली. मात्र गतविजेचा केकेआर या 18 व्या मोसमात (IPL 2025) चाचपडताना दिसत आहे. केकेआरने श्रेयस अय्यरला करारमुक्त केल्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. मात्र केकेआरला या हंगामात आतापर्यंत गतविजेता म्हणून अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नाही. केकेआरने या 18 व्या मोसमात एकूण 3 सामने खेळले आहेत. केकेआरला त्यापैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. केकेआर ज्या पद्धतीने खेळतेय, त्यानुसार ते गतविजेता आहेत, असं अजिबात वाटत नाहीय. केकेआरचं पहिल्या 3 सामन्यात नक्की कुठे चुकलं? तसेच ते कुठे कमी पडतायत? हे सविस्तर जाणून घेऊयात. केकेआरची पहिल्या 3 सामन्यांमधील कामगिरी गतविजेता केकेआर 18 व्या मोसमात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. केकेआरला सलामीच्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा