
आयपीएल 2025 मधील 39 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना आहे. अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर शुबमन गिल जीटीचं नेतृत्व करत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाहुण्या गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआरने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
कर्णधार अजिंक्य रहाणे याने गुजरात विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून दोघांचा पत्ता कट केला आहे. रहाणेने ओपनर विकेटकीपर क्विंटन डी कॉक आणि एनरिच नॉर्खिया या दोघांना डच्चू दिला आहे. तर डी कॉकच्या जागी अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरुबाज याला संधी दिली आहे. तर नॉर्खियाच्या जागी ऑलराउंडर मोईन अली याचा समावेश केला आहे.
गुजरात टायटन्सने या मोसमात आतापर्यंत शुबमन गिल याच्या नेतृत्वात 7 सामने खेळले आहेत. गुजरातने त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. गुजरात 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर कोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह सातव्या स्थानी आहे. केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी केकेआरला गुजरातविरुद्ध कमबॅक करावं लागणार आहे.
दरम्यान केकेआर विरुद्ध जीटी यांच्यात 3 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर केकेआरला एकच सामना जिंकता आला आहे. उभयसंघातील एक सामना पावसामुळे रद्द केला गेला होता.
2 पॉइंट्ससाठी लढाई, कोण जिंकणार?
Knight Riders 🆚 Titans 🤩
Who will add 2⃣ points in the bag tonight? 👝
Updates ▶ https://t.co/TwaiwD55gP#TATAIPL | #KKRvGT | @KKRiders | @gujarat_titans pic.twitter.com/mUrraay1Qx
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.