AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 KKR vs GT Live Streaming : कोलकातासमोर गुजरात टायटन्सचं आव्हान, ईडन गार्डन्समध्ये कोण जिंकणार?

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live Streaming: शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजराच टायटन्सने या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. गुजरात टीम 5 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर केकेआरला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत.

IPL 2025 KKR vs GT Live Streaming : कोलकातासमोर गुजरात टायटन्सचं आव्हान, ईडन गार्डन्समध्ये कोण जिंकणार?
KKR vs GT IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 10:29 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 39 व्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. गुजरात आणि केकेआर या दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना असणार आहे. अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा आहे. गुजरात या मोसमात आतापर्यंत सध्या धमाकेदार कामगिरी करत आहे. तर केकेआरला सातत्य राखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे केकेआरचा घरच्या मैदानातून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातला विजयी घोडदौड कायम राखायची असेल तर त्यांना केकेआरचा गड भेदावा लागेल.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. गुजरातने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला फक्त 2 सामन्यात अपयश आलं आहे. गुजरातचा नेट रनरेट हा +0.984 असा आहे. तर केकेआरला 7 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. केकेआरने 4 सामने गमावले आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये +0.547 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना केव्हा?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सोमवारी 21 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 4 पैकी 2 सामन्यांमध्ये केकेआरवर मात केली आहे. तर केकेआरला एकच सामना जिंकता आला आहे. तर उभयसंघातील 1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला.

Follow Us
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया