MI vs DC : सूर्यकुमार यादव आणि नमन धीर जोडीचा झंझावात, दिल्लीसमोर 181 रन्सचं टार्गेट, मुंबई जिंकणार का?

Mumbai Indians vs Delhi Capitals 1st Innings Highlights : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 181 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या जोडीने शेवटच्या काही षटकांमध्ये वादळी खेळी केली.

MI vs DC : सूर्यकुमार यादव आणि नमन धीर जोडीचा झंझावात, दिल्लीसमोर 181 रन्सचं टार्गेट, मुंबई जिंकणार का?
Naman Dhir And Suryakumar Yadav MI vs DC Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 21, 2025 | 10:12 PM

सूर्यकुमार यादव याचं अर्धशतक आणि नमन धीर याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये दिल्लीसमोर 181 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. सूर्यकुमार याचा अपवाद वगळता मुंबईच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्यामुळे मुंबई अडचणीत सापडली होती. त्यामुळे मुंबई 150 धावापर्यंत तरी पोहचेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र तिलक वर्मा 27 धावांवर आऊट झाल्यानंतर नमन धीर याने सूर्यकुमारच्या सोबतीने जोरदार फटकेबाजी केली. धीर आणि सूर्या या जोडीने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 48 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईला 180 पर्यंत मजल मारता आली. आता मुंबईचे गोलंदाज या धावांचा बचाव करतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईची बॅटिंग

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईला खास सुरुवात करता आली नाही. मुंबईने 23 धावांवर पहिली विकेट गमावली. रोहित शर्मा 5 रन्स करुन आऊट झाला. रोहितकडून वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितने निराशा केली. त्यानंतर विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन हे दोघे ठराविक अंतराने आऊट झाले. जॅक्सने 21 आणि रायनने 25 रन्स केल्या. हे दोघे आऊट झाल्याने मुंबईची 6.4 ओव्हरमध्ये 3 आऊट 58 अशी स्थिती झाली. त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा या जोडीने पलटणचा डाव सावरला.

सूर्या आणि तिलक या दोघांनी 1-1 धाव जोडत पलटणला पुढे नेलं. सूर्याने या दरम्यान संधी मिळेल तेव्हा काही फटके मारले. अशाप्रकारे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुकेश कुमारने ही सेट जोडी फोडली. मुकेशने तिलक वर्माला मैदानाबाहेर पाठवलं. तिलकला मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतर निर्णायक क्षणी सूर्याला साथ दिली. तिलकने 27 बॉलमध्ये 27 रन्स केल्या.

सूर्या आणि तिलक या दोघांनी 1-1 धाव जोडत पलटणला पुढे नेलं. सूर्याने या दरम्यान संधी मिळेल तेव्हा काही फटके मारले. अशाप्रकारे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुकेश कुमारने ही सेट जोडी फोडली. मुकेशने तिलक वर्माला मैदानाबाहेर पाठवलं. तिलकला मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतर निर्णायक क्षणी सूर्याला साथ दिली. तिलकने 27 बॉलमध्ये 27 रन्स केल्या. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. पलटण अडचणीत असल्याने हार्दिककडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र हार्दिकने निराशा केली. हार्दिक 3 रन्स करुन आऊट झाला.

शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गेम बदलला

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या दोघांनी काही चेंडू खेळून काढले. त्यानंतर दोघांनी निर्णायक क्षणी गिअर बदलला. या दोघांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 48 रन्स ठोकल्या. तसेच या जोडीने सहाव्या विकेटसाठी नॉट आऊट 57 रन्सची पार्टनरशीप केली. सूर्याने 43 बॉलमध्ये नॉट आऊट 73 रन्स केल्या. तर नमन धीर याने 8 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 24 धावांची निर्णायक खेळी केली.