
आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. मुंबईने गुजरातला वानखेडे स्टेडियममधील या सामन्यात विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र सामन्यातील दुसर्या डावादरम्यान अर्थात गुजरातच्या बॅटिंगदरम्यान पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. डीएलएस अर्थात डकवर्थ लुईस नियमानुसार या सामन्यात गुजरात टायटन्स आघाडीवर आहे. त्यामुळे पावसामुळे उर्वरित खेळ न होऊ शकल्यास गुजरात टायटन्स विजेता ठरेल. त्यामुळे सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्याने पलटणसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
विल जॅक्स याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. त्यामुळे गुजरातला 156 धावांचं आव्हान मिळालं. त्यानंतर मुंबईने गुजरातला पहिला झटका देत अप्रतिम सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट याने साई सुदर्शन याला 5 धावांवर आऊट केलं. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 72 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अश्वनी कुमार याने ही सेट जोडी फोडली. अश्वनीने जोसला 30 रन्सवर आऊट केलं.
त्यानंतर शुबमन गिल आणि शेरफान रुदरफोर्ड या दोघांनी गुजरातला पुढे नेलं. गुजरातने 14 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 107 धावा केल्या. शुबमन 30 आणि शेरफेन 26 धावांवर नॉट आऊट खेळत होते. त्यानंतर अडीच मिनिटांचा टाईम आऊट झाला. या दरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे टाईम आऊट संपण्याआधीच खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना खेळ पुन्हा केव्हा सुरु होणार? याची प्रतिक्षा लागून आहे.
पाऊस आला आणि खेळ थांबला
Match 5⃣6⃣ between @mipaltan and @gujarat_titans has stopped due to rain 🌧️
Stay tuned for further updates.
Updates ▶ https://t.co/DdKG6Zn78k #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/3iMaIiJnL5
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2025
दरम्यान आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 2 सामन्यांचा पावसामुळे निकाल लागू शकला नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 26 एप्रिलला झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यानंतर मंगळवारी 5 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामनाही पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे नियमांनुसार दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला.