MI vs GT : विल जॅक्सची अर्धशतकी खेळी, गुजरातसमोर 156 रन्सचं टार्गेट, मुंबई बचाव करणार?
Mumbai Indians vs Gujarat Titans 1st innings Highlights : रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही फलंदाजांकडून मुंबईच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा होती. मात्र हे दोघे अपयशी ठरले. तर विल जॅक्स याने अर्धशतकी खेळी केली.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स या दोघांचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी घोर निराशा केली. मुंबईच्या मुख्य 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र सूर्या आणि जॅक्स या दोघांनी काही वेळ मैदानात घालवला. जॅक्सने अर्धशतकी खेळी केली. तर सूर्याने 35 धावांची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने 27 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 150 मजल मारता आली.
मुंबईची बॅटिंग
रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा ही ओपनिंग जोडी मुंबईला अपेक्षित सुरुवात देण्यात अपयशी ठरली. रायन रिकेल्टेन 2 आणि रोहित शर्मा 7 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईची 2 आऊट 26 अशी स्थिती झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्या आणि जॅक्स जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 71 रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी पूर्णपणे सेट झाली होती. मात्र सूर्यकुमार यादव आऊट झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारने 24 चेंडूत 35 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 5 चौकार लगावले. सूर्या आऊट झाल्याने मुंबईची 10.4 ओव्हरमध्ये 3 आऊट 97 अशी स्थिती झाली.
मुंबईची घसरगुंडी
सूर्या आऊट झाल्यानंतर मुंबईची घसरगुंडी झाली. सूर्यानंतर विल जॅक्स बाद झाला. विल जॅक्स याने 35 चेंडूत 3 सिक्स आणि 5 फोरसह 53 रन्स केल्या. विलचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या 1 रन करुन माघारी परतला. तिलक वर्मा याने निराशा केली. तिलक 7 धावा करुन मैदानाबाहेर गेला. नमन धीर फटकेबाजीच्या प्रयत्नात 7 रन्सवर कॅच आऊट झाला.
त्यानंतर कॉर्बिन बॉश याने शेवटच्या काही चेंडूत टॉप गिअर टाकला. बॉशने 22 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्ससह 27 रन्स केल्या. मात्र विकेटकीपर जोस बटलर याच्या चलाखीमुळे बॉश रन आऊट झाला. बोशनंतर दीपक चाहर आणि कर्ण शर्मा ही जोडी नाबाद परतली. दीपकने 8 आणि कर्णने 1 धाव केली.
गुजरातसमोर 156 रन्सचं टार्गेट
Innings break! @mipaltan post a total of 155/8 on board 👏
Will Gujarat Titans chase this down and move 🔝 of the table? 🤔
Updates ▶ https://t.co/DdKG6Zn78k #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/Sinl6RdL9h
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2025
गुजरातकडून 6 जणांनी बॉलिंग केली. गुजरातचे 6 गोलंदाज यशस्वी ठरले. साई किशोर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिध खान, राशीद खान आणि गेराल्ड कोएत्झी या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
