AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT : रोहित शर्मा आऊट होताच आशिष नेहराचं आक्रमक सेलीब्रेशन, पाहा

Rohit Sharma and Ashish Nehra : गुजरात टायटन्स टीम मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला त्याच्या घरच्या मैदानात मोठी खेळी करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर गुजरातचा हेड कोच आशिष नेहरा याने आक्रमक सेलीब्रेशन केलं.

MI vs GT : रोहित शर्मा आऊट होताच आशिष नेहराचं आक्रमक सेलीब्रेशन, पाहा
Rohit Sharma and Ashish Nehra MI vs GTImage Credit source: Social Media
| Updated on: May 06, 2025 | 8:39 PM
Share

वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2025 मधील 56 वा सामना खेळण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे पहिल्या डावात मुंबईची बॅटिंग पाहायला मिळणार असल्याने पलटण चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पलटणला रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ही सलामी जोडी मुंबईला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरले. रायन रिकेल्टन 2 चेंडूत 2 धावा करुन आऊट झाला.

त्यानंतर लोकल बॉय रोहित शर्मा याने विल जॅक्स याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 24 धावा जोडल्या. रोहित गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहितकडून वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितने चाहत्यांची निराशा केली. रोहितने 1 चौकारासह 8 बॉलमध्ये 7 रन्स केल्या आणि आऊट झाला. रोहित आऊट झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहरा याने आक्रमक सेलीब्रेशन केलं. आशिष नेहराने केलेलं सेलीब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

नक्की काय झालं?

वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी कमबॅक केलेल्या अर्शद खान याने मुंबईच्या डावातील चौथ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर रोहित शर्मा याला आऊट केलं. अर्शदने रोहितला प्रसिध कृष्णा याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित आऊट होताच डगआऊमध्ये असलेल्या आशिष नेहरा याने जोरात टाळ्या वाजवल्या. नेहराने यासह गुजरात टीमचा उत्साह वाढवला. मात्र नेहराने केलेल्या या सेलिब्रेशनमधून रोहितची विकेट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे? हे स्पष्ट झालं.

आशिष नेहराचं आक्रमक सेलीब्रेशन

रोहितची IPL 2025 मधील आतापर्यंतची कामगिरी

दरम्यान रोहितने या 18 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. रोहितने या 11 सामन्यांमध्ये 152.28 या स्ट्राईक रेटने आणि 30 च्या सरासरीने 197 बॉलमध्ये 300 रन्स केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितने या मोसमात 17 षटकार आणि 28 चौकारही लगावले आहेत.

मुंबई गुजरातचा हिशोब बरोबर करणार?

दरम्यान मुंबई विरुद्ध गुजरात या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याआधी 29 मार्च रोजी गुजरातने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबई आपल्या होम ग्राउंडमध्ये गुजरातचा हिशोब चुकता करणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.