IPL 2025 : मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठी आता सोपं गणित, टॉप 2 मध्ये राहण्यासाठी…

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने फिनिक्स भरारी घेतली आहे. पाच पैकी चार सामन्यात सुरुवातीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्स कमबॅक करेल की नाही याबाबत शंका होती. मात्र त्यानंतर सलग सहा सामने जिंकले आणि गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.

IPL 2025 : मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठी आता सोपं गणित, टॉप 2 मध्ये राहण्यासाठी...
मुंबई इंडियन्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 01, 2025 | 11:23 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवला आहे. मुंबई इंडियन्सची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती. इतकंच काय तर पहिल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे संघ नवव्या स्थानावर होता. पण एक एक सलग सहा सामने जिंकले आणि आता अव्वल स्थान गाठलं आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून 14 गुणांची कमाई केली आहे. आरसीबीपेक्षा नेट रनरेट चांगला असल्याने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. म्हणजेच उरलेल्या तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर 14 गुण मिळवणारा मुंबई इंडियन्स या पर्वातील दुसरा संघ आहे. त्यात 16 गुण झाले की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे.

मुंबई इंडियन्सला टॉप 2 साठी काय करावं लागेल?

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे दोन गुण तर मिळाले. त्याचबरोबर नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स तिसर्‍या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. मुंबई इंडियन्सपूर्वी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु 14 गुण आणि +0.521 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर होता. मुंबई इंडियन्सने पहिलं स्थान गाठलं आहे. आता टॉप 2 मधील स्थान कायम ठेवण्यासाठी काय करावं लागेल. मुंबई इंडियन्सला टॉप 2 मधील स्थान कायम ठेवायचं असेल. उर्वरित तीन पैकी तीन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे 20 गुण होतील. पण आरसीबी, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांवर नजर ठेवावी लागेल.

विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचे शेवटचे तीन सामने गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्ससोबत आहेत. गुजरात विरुद्ध 6 मे रोजी, पंजाब किंग्सविरुद्ध 11 मे आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 15 मे रोजी सामना आहे. प्लेऑफसाठी यापैकी एक सामना जिंकणं भाग आहे. पण टॉप 2 मध्ये जागा मिळवायची तर या तिन्ही संघांना पराभूत करणं आवश्यक आहे. कारण टॉप 2 संघांना प्लेऑफमधील एका विजयानंतर थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळतं. तसेच पराभूत संघाला फायनलसाठी आणखी एक संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहणं फायद्याचं ठरतं.

गुजरात टायटन्सचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे 22 गुण होऊ शकतात. आरसीबीचे 4 सामने शिल्लक असून 22 गुण, पंजाब किंग्सचे 4 सामने शिल्लक असून 21 गुण, दिल्ली कॅपिटल्से 4 सामने शिल्लक असून 20 गुण होऊ शकतात. तर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे शर्यतीत आहेत. पण टॉप 2 मध्ये स्थान मिळवणं कठीण आहे. सनरायझर्स हैदराबाद उर्वरित पाच पैकी पाच सामने जिंकले तर जास्तीत जास्त टॉप 4 मध्ये येईल. पण पहिल्या दोन स्थानी विराजमान होणं कठीण आहे.