IPL 2025, PBKS vs DC : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पंजाब किंग्सने हा सामना जिंकला तर गुणतालिकेत टॉपला जाईल. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

IPL 2025, PBKS vs DC : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की...
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 08, 2025 | 8:23 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना धर्मशाळेत होत असल्याने याचं महत्त्व आहे. कारण भारत पाकिस्तान सीमेपासून 150 किमी अंतरावर हे मैदान आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांना हा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे सर्वार्थाने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पंजाब किंग्सने खेळलेल्या 11 सामन्यांत 7 विजय, 3 पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह पंजाब पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सच्या खात्यात 15 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ 11 सामन्यांत 6 विजय, 4 पराभव आणि एक अनिर्णित राहिल्याने पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 13 गुण आहेत. दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. एक तास उशिराने सामना सुरु झाला. मात्र एकही षटक कमी केलं नाही. नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही मैदानाचा विचार करून प्रथम फलंदाजी करू. चाहते या निर्णयावर खूश आहेत. जर तुम्ही आयपीएलमधील ट्रेंड पाहिला तर, जे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि तुमचे सामने जिंकतात ते तुम्हाला विजेतेपद जिंकवतात. ही एक मोठी प्रेरणादायी बाब आहे. संघ उत्साहात आहे. योग्यरित्या निवड करणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या दिनचर्येचे पालन केले पाहिजे. आम्ही त्याच फलंदाजी क्रमवारीसह जात आहोत.’ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘हवामानामुळे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण केले असते. खेळपट्टी तशीच राहील. ही एक लांब स्पर्धा आहे आणि सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. विप्रज निगमऐवजी माधव तिवारीची निवड झाली आहे.’

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 33 आयपीएल सामन्यात आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघात तुल्यबल लढाई आहे. पंजाब किंग्सने 17 विजयांसह दिल्ली कॅपिटल्स एका सामन्यात आघाडी घेतली आहे. तर कॅपिटल्सने 16 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमातुल्ला ओमरझाई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन.