
आयपीएलच्या 18 व्या मोसमात शनिवारी 5 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. अर्थात शनिवारी 2 सामने होणार आहेत. दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यापासून राजस्थानचा कर्णधार बदलणार आहे. नियमित कर्णधार संजू सॅमसन राजस्थानचं पहिल्या 3 सामन्यांनंतर नेतृत्व करणार आहे. संजूला दुखापत असल्याने रियान पराग याने पहिल्या 3 सामन्यात नेतृत्व केलं. मात्र रियानला या संधीचं सोनं करता आलं नाही. रियानच्या नेतृत्वात राजस्थानने सलग आणि पहिले दोन्ही सामने गमावले. तर तिसऱ्या सामन्यात चेन्नईवर 6 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं.
तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सने नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. पंजाबने श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे संजूसमोर कर्णधार म्हणून कमबॅक करत असताना राजस्थानला विजयी ट्रॅकवर कायम ठेवण्यासह पंजाबला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना शनिवारी 5 एप्रिलला होणार आहे.
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंडीगढ येथे होणार आहे.
पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन (कर्णधार), कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.
पंजाब किंग्स टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.