आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून हे तीन संघ बाहेर होणार! पुढच्या दोन तीन सामन्यातच होणार फैसला

आयपीएल 2025 स्पर्धेचा मधला टप्पा सुरु झाला आहे. आतापर्यंत 25 सामने झाले असून प्लेऑफसाठीची शर्यत आता चुरशीची झाली आहे. या स्पर्धेत काही संघांची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून हे तीन संघ बाहेर होणार! पुढच्या दोन तीन सामन्यातच होणार फैसला
| Updated on: Apr 12, 2025 | 4:20 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत तीन संघांची कामगिरी सर्वात सुमार राहिली आहे. यात चेन्नई सुपर किंग्स हा संघ आघाडीवर आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा क्रमांक लागतो. चेन्नई सुपर किंग्स आतापर्यंत स्पर्धेत 6 सामने खेळली आहे. त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. उर्वरित 8 पैकी 7 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. म्हणजेच 16 गुण होतील आणि प्लेऑफचं गणित सुटेल. दुसरीकडे, 6 सामन्यात विजय मिळवल्यास गणित जर तर वर येईल. त्यातही नेट रनरेट हा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा 8 पैकी 2 सामन्यात पराभव झाला तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स उर्वरित आठ सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून असेल.

मुंबई इंडियन्सची स्थितीही काहीशी अशीच आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. मुंबईसाठी आता यापुढे प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सला उर्वरित 9 पैकी 7 सामन्यात विजय हवा आहे. 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पात्र ठरेल. मुंबईला उर्वरित 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला तर गणित जर तरवर असेल. सनरायझर्स हैदराबादच्या बाबतीतही असंच काहीसं असेल. कारण सनरायर्झ हैदराबादची स्थितीही मुंबई इंडियन्स सारखी आहे. पण नेट रनरेट खूपच पडला असल्याने शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे काठावर प्लेऑफमध्ये स्थान मिळावायचं झालं तरी नेट रनरेट सुधारावा लागणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच असं घडलं आहे. संघाने सहा पैकी पाच सामन्यांमध्ये पराभव पत्कारून प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.इतकंच विजेतेपदही जिंकले आहे. हा चमत्कार 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने केला होता. 2015 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सहापैकी पाच सामने गमावले होते.यानंतर पुनरागमन करत आठ पैकी 7 सामने जिंकले आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. यानंतर प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात सीएसके संघाला पराभूत करून विजेतेपद जिंकले.