राजस्थान रॉयल्सच्या सीईओंना झालं दु:ख! सामन्यानंतर गाठलं थेट दारुचं दुकान Video Viral

आयपीएल 2025 स्पर्धेतही राजस्थान रॉयल्सची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. सलग पाच सामने गमवल्याने आता प्लेऑफच्या आशाही मावळल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव होताच राजस्थानच्या सीईओने 'टॉनिक' दुकान गाठल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सच्या सीईओंना झालं दु:ख! सामन्यानंतर गाठलं थेट दारुचं दुकान Video Viral
राजस्थान रॉयल्स सीईओ
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2025 | 9:48 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा काही तालमेल बसला नाही. एकही खेळाडू हवा तसा फॉर्मात नाही. त्यामुळे संघाला वारंवार पराभवाला सामोरं जावं लागत आहे. त्याच संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्यानी संघाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम नेतृत्वही नाही. त्यामुळे संघाचा पाय आणखी खोलात गेला आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्स अजूनपर्यंत दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाही प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स एकंदरीत स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. राजस्थान रॉयल्स सलग पाच सामन्यात पराभूत झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानचा 11 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे सीईओ जेक लश मॅक्रम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते बंगळुरूमधील एका प्रसिद्ध दारूच्या दुकानाला भेट देताना दिसत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव होताच राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहे. संघाच्या पराभवानंतर राजस्थानचे सीईओ मॅक्रम चिन्नास्वामी स्टेडियमच्या शेजारी असलेल्या ‘टॉनिक’ या दारूच्या दुकानात गेले. आरसीबीच्या एका समर्थकाने याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘राजस्थान रॉयल्सचे सीईओ लश मॅक्रम दारू पिऊन पराभवाचे दुःख विसरत आहेत.’ तर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, ‘संघाच्या पराभवानंतरचे दुःख विसरण्यासाठी मॅक्रम प्यायची आहे.’

राजस्थान रॉयल्स संघाचं नशिब यावेळी साथ देताना दिसत नाही. मागच्या तीन सामन्यात विजयाने हुलकावणी दिली. सहज सामना जिंकेल असं वाटत असताना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटच्या षटकात 9 धावा करता आल्या नाहीत. फक्त 2 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धचा सामनाही सहज जिंकेल असं वाटत होतं. पण शेवटच्या टप्प्यात धडाधड विकेट पडल्या आणि सामना 11 धावांनी गमावला.