AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफचं गणित जर तर वर, दहा संघांना अजूनही संधी; कसं काय ते वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंत 42 सामन्यांचा खेळ संपला आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत एकदम चुरशीची होताना दिसत आहे. अजूनही कोणताच संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला नाही. पण येत्या काही सामन्यात हे चित्र स्पष्ट होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती विजय आवश्यक आहेत ते...

IPL 2025 : प्लेऑफचं गणित जर तर वर, दहा संघांना अजूनही संधी; कसं काय ते वाचा
आयपीएलचे सर्व संघ
| Updated on: Apr 25, 2025 | 11:23 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफचं चित्र अजूनही जर तर वर आहे. कोणत्याही संघाने प्लेऑफमधील दावा किंवा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेतील समीकरणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. 42व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांकडे बारीक लक्ष लागून आहे.

गुजरात टायटन्सने शुबमन गिलच्या नेतृत्वात 12 गुण आणि +1.104 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. आता सहा सामने शिल्लक असून त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. उर्वरित सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे प्रतिस्पर्धी असतील.

दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला असून 12 गुण आणि +0.657 नेट रनरेटचसह दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित सहा सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल. आरसीबी, केकेआर, एसआरएच, पीबीकेएस, जीटी आणि एमआयशी सामना करेल.

आरसीबीने यंदाच्या पर्वात रजत पाटिदाराच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत 12 गुण आणि +0.482 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. उर्वरित पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. डीसी, सीएसके, एलएसजी, एसआरएच आणि केकेआर हे आरसीबीचे प्रतिस्पर्धी असतील.

मुंबई इंडियन्स या स्पर्धेच्या सुरुवातीला तळाशी होता. मात्र सलग चार सामने जिंकून टॉप 4 मध्ये जागा मिळवी आहे. मुंबई इंडियन्सने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. 10 गुण आणि +0.673 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. आता पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमध्ये जागा मिळेल. एमआय त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये एलएसजी, आरआर, जीटी, पीबीकेएस आणि डीसीशी सामना करेल.

पंजाब किग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या खात्यातही प्रत्येकी 10 गुण आहेत. पण नेट रनरेटमध्ये फरक पडल्याने क्रमवारीत पाठीपुढे आहेत. पंजाब किंग्सला 6 सामने खेळायचे असून त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवायचा आहे. पंजाबचे सामने केकेआर, सीएसके, एलएसजी, डीसी, एमआय, आरआर यांच्याशी होणार आहेत. तर लखनौ सुपर जायंट्सला उर्वरित 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवावा लागेल. उर्वरित सामने एमआय, पीबीकेएस, आरसीबी, जीटी, एसआरएचशी आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स 6 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित 6 पैकी 5 सामन्यात विजय आवश्यक आहे. तरच प्लेऑफचं गणित सुटेल. उर्वरित सामने पीबीकेएस, डीसी, आरआर, सीएसके, एसआरएच आणि आरसीबीचा होणार आहेत.

राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांची स्थिती नाजूक आहे. या तिन्ही संघांना प्लेऑफमधून आऊट होण्याची भीती आहे. राजस्थानच्या पदरात 4 गुण असून उर्वरित पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला तरी दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. राजस्थानचे पुढील सामने जीटी, एमआय, केकेआर, सीएसके, पीबीकेएसशी आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या पदरातही 4 गुण आहेत. पण उर्वरित सहा पैकी सहा सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. उर्वरित सामने सीएसके, जीटी, डीसी, केकेआर, आरसीबी आणि एलएसजी यांच्याशी आहेत.  चेन्नई सुपर किंग्सची स्थितीही हैदराबादसारखीच आहे. उर्वरित सामने एसआरएच, पीबीकेएस, आरसीबी, केकेआर, आरआर, जीटी यांच्याशी आहेत.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.