
दिल्ली कॅपिटल्सने गुरुवार 10 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी मिळालेलं 164 धावांचं आव्हान हे अवघ्या 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने आरसीबीला पराभूत करत आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात सलग आणि एकूण चौथा विजय साकारला. एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ‘लोकल बॉय’ केएल राहुल हा आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
केएलने दिल्लीसाठी नाबाद 93 धावांची खेळी केली आणि सहज विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा हा एकूण आणि घरच्या मैदानातील दुसरा पराभव ठरला. रजत पाटीदार याची एक चूक ही आरसीबीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. रजतने ऑन कॅमेरा ही चूक करत एकाप्रकारे आरसीबीला जिंकवण्यात मदत केली, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
आरसीबीने दिल्ली कॅपिट्ल्सला 164 धावांचा पाठलाग करताना तिसर्या ओव्हरपर्यंत 2 झटके देत अप्रतिम सुरुवात केली होती. फाफ डु प्लेसीस आणि जेक फ्रेझर मॅकग्रूक ही सलामी जोडी आऊट झाल्याने दिल्ली बॅकफुटवर आली होती. त्यानंतर आरसीबीला आणखी एक विकेट घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवण्याची संधी होती. मात्र कर्णधार रजत पाटीदार याने या संधची माती केली.
रजतने मॅचविनर ठरलेल्या केएल राहुल याचा कॅट सोडला. दिल्लीच्या डावातील चौथी ओव्हर यश दयाल टाकत होता. या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर केएलने मोठा फटका मारला. रजतने हवेतील बॉलचा अचूक अंदाज घेत त्या वेगात धावला आणि कॅच घेण्यासाठी झेप घेतली. रजतला पहिल्या प्रयत्नात कॅच घेता आला नाही. रजतच्या हातून बॉल सटकला. रजतने दुसऱ्या प्रयत्नात कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रजत इथेही अपयशी ठरला आणि अशापक्रारे केएलला कर्णधार रजत पाटीदार कडून जीवनदान मिळालं. रजतने कॅच सोडली तेव्हा केएल 5 धावांवर होता. तर केएलने नाबाद 92 धावांची खेळी करत दिल्ली विजय मिळवून दिला. रजतची ही एक चूक आरसीबीला अशाप्रकारे पराभूत करण्यात निर्णायक ठरली.
कॅच नाही, मॅच सोडली
Huge moment in the match 🙆♂️
Rajat Patidar drops the big catch of KL Rahul ❌😮#RCBvDC pic.twitter.com/Npx2QHgafE
— CricXtasy (@CricXtasy) April 10, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.