
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाब किंग्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. पंजाब आणि आरसीबीचा हा या मोसमातील सातवा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या हंगामात सारखीच कामगिरी राहिली आहे. पंजाब आणि बंगळुरुने प्रत्येकी 4 सामने जिंकेल आहेत. तसेच दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही संघामधील सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघांनी 4 सामने जिंकलेत. मात्र ते सातत्य ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. आरसीबीने पहिले 2 सामने सलग जिंकले. त्यानंतर तिसरा सामना गमावला. आरसीबीने पुन्हा कमबॅक केलं. मात्र पाचवा सामना गमवावा लागला. तर सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करत आरसीबीने चौथा विजय मिळवला. पंजाबचाही असाच प्रवास राहिला आहे. त्यामुळे आता सलग दुसरा आणि एकूण पाचवा विजय मिळवण्यासाठी पंजाब आणि आरसीबीमध्ये रस्सीखेच असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना शुक्रवारी 18 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम,बंगळुरु येथे होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान आरसीबीचा नेट रनरेट हा पंजाबपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पंजाबपेक्षा पुढे आहे. आरसीबी +0.672 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब +0.172 नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.