IPL 2025 : ऑरेंज कॅपसाठी जोरदार चुरस, टॉप 5 मध्ये 3 भारतीय, नंबर 1 कोण?
IPL 2025 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 पैकी 2 फलंदाज हे लखनौ सुपर जायंट्सचे आहेत. तर इतर 3 संघांचे प्रत्येकी 1-1 खेळाडू आहेत. या टॉप 5 मध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या अनुभवी फलंदाजांचाही समावेश आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत 32 सामने खेळवण्यात आले आहेत. या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला. राजस्थानला 189 धावांचा पाठलाग करताना 188 रन्स करता आल्या. राजस्थानला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. मात्र स्ट्राईक एंडवर ध्रुव जुरेल रन आऊट झाला आणि सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये मिळालेलं 12 धावांचं आव्हान हे 4 चेंडूत पूर्ण केलं. दिल्ली कॅपिट्ल्स टीमने अशाप्रकारे या मोसमातील पाचवा विजय मिळवला. दिल्लीचे यासह एकूण 10 पॉइंटस झाले आहेत. एका बाजूला या 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळत आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या 5 फलंदाजांपैकी 3 भारतीय खेळाडू आहेत. तर 2 परदेशी खेळाडू आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा विजेता ठरतो. तर हंगामादरम्यान सर्वाधिक धावांनुसार ऑरेंज कॅपची अदलाबदल होत असते. तसेच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं.
टॉप 5 मध्ये कोण?
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन दुसऱ्या स्थानी आहे. लखनौचा मिचेल मार्श तिसऱ्या, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या तर आरसीबीचा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
कुणाच्या नावावर किती धावा?
- निकोलस पूरन, 7 सामने आणि 357 धावा
- साई सुदर्शन, 6 सामने 329 धावा
- मिचेल मार्श, 6 सामने 295 धावा
- श्रेयस अय्यर, 6 सामने 250 धावा
- विराट कोहली, 6 सामने 248 धावा
पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण?
पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये 4 भारतीय गोलंदाज आहेत. या 5 गोलंदाजांमध्ये अनुक्रमे नूर अहमद (सीएसके), कुलदीप यादव (दिल्ली), खलील अहमद (चेन्नई), शार्दुल ठाकुर (लखनौ) आणि वरुण चक्रवर्ती (केकेआर) यांचा समावेश आहे.
निकोलस पूरन आणि नूर अहमद नंबर 1
Here are the Orange Cap and Purple Cap standings after the 32nd match of IPL 2025 🧡💜#IPL2025 #DCvsRR #OrangeCap #PurpleCap #InsideSport #CricketTwitter pic.twitter.com/3B1TbnpUGA
— InsideSport (@InsideSportIND) April 16, 2025
नूर अहमद याच्या नावावर सर्वाधिक 12 विकेट्स आहेत. तर कुलदीप, खलील आणि शार्दुल या तिघांच्या नाववर प्रत्येकी 11 विकेट्स आहेत. तर वरुण चक्रवर्ती याच्या नावावर 10 विकेट्स आहेत.