RR vs GT : शुबमन आणि जोसची तडाखेदार खेळी, राजस्थानसमोर 210 धावांचं आव्हान, गुजरात रोखणार?

Rajasthan Royals vs Gujarat Titans 1st Innings Highlights : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सच्या होम ग्राउंडमध्ये 200 पार मजल मारली आहे. गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

RR vs GT : शुबमन आणि जोसची तडाखेदार खेळी, राजस्थानसमोर 210 धावांचं आव्हान, गुजरात रोखणार?
Shubman Gill And Jos Buttler RR vs GT
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 28, 2025 | 10:00 PM

कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने टीमने राजस्थान रॉयल्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन आणि बटलर व्यतिरिक्त साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही योगदान दिलं. गुजरातच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता गुजरातला जिंकायचं असेल तर त्यांच्या गोलंदाजांवर संपूर्ण मदार असणार आहे.

गुजरातची बॅटिंग

कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शुबमनने 50 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 168 च्या स्ट्राईक रेटने 84 रन्स केल्या. जोस बटलर याने 26 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. ओपनर साई सुदर्शन याने 30 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 39 रन्स केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 13 धावांचं योगदान दिलं. राहुल तेवतिया 9 रन्स केल्या. तर शाहरुख खानने नाबाद 5 धावा केल्या. तर राजस्थानकडून महीश तीक्षणा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

राजस्थानकडे परतफेड करण्याची संधी?

राजस्थानकडे हा सामना जिंकून 9 एप्रिलच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. गुजरातने राजस्थानवर 58 धावांनी मात केली होती. गुजरातने त्या सामन्यात राजस्थानसमोर 218 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थानला गुजरातसमोर धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने राजस्थानला 19.2 ओव्हरमध्ये 159 धावांवर ऑलआऊट करत विजय मिळवला होता.

राजस्थान रॉयल्ससमोर 210 धावांचं आव्हान

दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान गुजरातचा हा या मोसमातील नववा सामना आहे. गुजरातने आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. गुजरात 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. गुजरातचा नेट रनरेट +1.104 असा आहे. तर राजस्थानचा हा या हंगामातील 10 वा सामना आहे. राजस्थानला 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर राजस्थानचा 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. राजस्थान 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा -0.625 असा आहे.

राजस्थान पराभवाचा षटकार टाळणार?

दरम्यान राजस्थानला गेल्या 5 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता राजस्थाला या स्पर्धेतील आव्हान कायम राखायचं असेल तर गुजरातविरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे.