RR vs LSG : आवेश खानकडून 9 धावांचा शानदार बचाव, लखनौचा 2 रन्सने विजय, राजस्थानचा सहावा पराभव

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Result : लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानात विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आवेश खान याने शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांचा यशस्वी बचाव केला आणि लखनौला विजयी केलं.

RR vs LSG : आवेश खानकडून 9 धावांचा शानदार बचाव, लखनौचा 2 रन्सने विजय, राजस्थानचा सहावा पराभव
Avesh Khan RR vs LSG Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 12:30 AM

आवेश खान याने शेवटच्या ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग करत राजस्थान रॉयल्सच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि लखनौ सुपर जायंट्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पाचवा विजय मिळवून दिला.  लखनौने हा सामना 2 धावांनी जिंकला.  राजस्थानला 181 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 9 रन्सची गरज होती. मात्र आवेशने चिवट मारा करत राजस्थानला विजयी धावांपर्यंत पोहचण्यापासून रोखलं आणि या 9 धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 178 धावाच करता आल्या. राजस्थानचा हा अशाप्रकारे या हंगामातील एकूण सहावा तर सलग चौथा पराभव ठरला.

राजस्थानचे फिनिशर फ्लॉप

लखनौने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये टॉस जिंकून 180 धावा केल्या. लखनौसाठी एडन मारक्रम आणि आयुष बदोनी या जोडीने अर्धशतकी खेळी केली. तर अब्दुल समद याने फिनिशिंग टच दिला. एडन मारक्रम याने लखनौसाठी सर्वाधिक 66 धावांचं योगदान दिलं. तर आयुष बदोनी याने 50 धावा केल्या. तर अब्दुल समद याने अखेरच्या क्षणी फिनीशिंग टच देत 10 बॉलमध्ये नॉट आऊट 30 रन्स केल्या. राजस्थानकडून प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वाल याने अर्धशतकी खेळी केली. डेब्यूटंट वैभव सूर्यवंशी याने स्फोटक बॅटिंग केली. मात्र त्यानंतर फिनीशर पुन्हा एकदा राजस्थानला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल याने 52 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 74 रन्स केल्या. डेब्यूटंट वैभव सूर्यवंशी याने 20 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरसह 34 रन्स करुन साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. कर्णधार रियान पराग याने 39 धावांचं योगदान दिलं. नितीश राणा याने 8 तर शिमरॉन हेटमायर 12 धावा करुन आऊट झाले. तर ध्रुव जुरेल आणि शुबम दुबे हे दोघे राजस्थानला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ध्रुवने 6 आणि शुबमने नाबाद 3 धावा केल्या. तर लखनौकडून आवेश खान याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आवेशने 4 ओव्हरमध्ये 37 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. तर एडन मारक्रम आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

गेमचेंजर आवेश खान ‘मॅन ऑफ द मॅच’

लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी

दरम्यान लखनौने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाची झेप घेतली आहे. लखनौ पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी पोहचली आहे. लखनौच्या खात्यात 5 विजय 10 गुण झाले आहेत. तर लखनौचा नेट रनरेट हा +0.088 असा आहे.