RR vs RCB Toss : आरसीबीच्या बाजूने टॉसचा कॉल, राजस्थानची घरच्या मैदानात पहिले बॅटिंग, हा खेळाडू परतला

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Playing Eleven : राजस्थान रॉयल्स टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात एका बदलासह उतरली आहे.

RR vs RCB Toss : आरसीबीच्या बाजूने टॉसचा कॉल, राजस्थानची घरच्या मैदानात पहिले बॅटिंग, हा खेळाडू परतला
RR vs RCB Toss Ipl 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 13, 2025 | 3:41 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज 13 एप्रिलला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत यजमान राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघांचा सहावा सामना

राजस्थान आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना आहे. दोन्ही संघांना शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. राजस्थानने 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे आरसीबीचा घराबाहेर दबदबा राहिला आहे. आरसीबीने घराबाहेर खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर घरच्या मैदानात दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता आरसीबी राजस्थानविरुद्ध घराबाहेरील दबदबा कायम ठेवणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थानकडून एकमेव बदल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरसीबीने त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे फझलहक फारुकी याला बाहेर व्हावं लागलं आहे.

आरसीबीच्या बाजूने टॉसचा कॉल

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि यश दयाल.