
आयपीएल 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ सामने आले होते. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सोपं असं सुरुवातीला वाटत होतं. पण मुंबई इंडियन्सला हे आव्हान गाठण्यासाठी 19 षटकांचा सामना करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 गडी गमवून दिलेलं आव्हान पूर्ण केलं. मुंबई इंडियन्स विजय लक्ष्य गाठण्यासाठी 18.1 षचटकांचा सामना केला आणि 11 चेंडू राखले. तिलक वर्माने विजयी चौकार मारून सामना जिंकून दिला. या विजयासह मुंबई इंडियन्सला 2 गुण मिळाले. मात्र नेट रनरेटमध्ये मोठा फरक नसल्याने सातव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद पराभवानंतर नवव्या स्थानावर आहे. या पर्वात सनरायझर्स हैदराबाद एकमेक संघ असा आहे की, त्याला होमग्राउंडव्यतिरिक्त एकही सामना जिंकता आला नाही. दिल्ली विरुद्ध विझागमध्ये, केकेआरविरुद्ध कोलकात्यात आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर पराभव झाला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ही विकेट वाटते तितकी सोपी नव्हती. कमी धावा कमी असल्याने आम्हाला बॅटने आणखी काही खेळायला आवडले असते. अवघड विकेट होती. जेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्हाला ती खरोखरच वेगवान आणि अस्खलित वाटेल अशी अपेक्षा असते, पण तसे नव्हते. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, आमच्या बऱ्याच हिटिंग एरिया बंद केल्या. मला वाटले की आमचे सर्व बेस कव्हर केले आहेत. 160 धावा असताना तुम्हाला असे वाटते की तुम्ही थोडे कमी आहात. आम्ही चेंडूने चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटले की आम्हाला विकेटची आवश्यकता आहे, आमच्याकडे भरपूर डेथ बॉलिंग होती, आम्हाला माहित होते की इम्पॅक्ट प्लेअर 1-2 षटके टाकेल म्हणूनच आम्ही राहुलसोबत गेलो.’
‘अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तुम्हाला घराबाहेर चांगले खेळावे लागेल, दुर्दैवाने या हंगामात आतापर्यंत त्यात यश मिळालं नाही. आमच्याकडे एक छोटा ब्रेक आहे आणि आम्ही पुन्हा परतू. आम्ही ज्या प्रत्येक सामन्याचे मूल्यांकन करण्याबद्दल बोलतो, मुलांनी पॉवरप्लेमधून चांगले खेळले आणि बेपर्वा हिटिंग झाले नाही. पुढचा सामना घरच्या मैदानावर आहे आणि आम्हाला ते ठिकाण चांगले माहित आहे.’, असं पॅट कमिन्स पुढे म्हणाला.