AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल जवळपास निश्चित, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी आरसीबी संघात दोन बदल अपेक्षित आहेत.

IPL 2025 : क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल जवळपास निश्चित, काय ते जाणून घ्या
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 28, 2025 | 10:26 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या क्वॉलिफायर फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या फेरीत कधीही जेतेपद न जिंकणारे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची मागच्या 17 पर्वात झोळी रिती आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी जेतेपद जिंकण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरसीबीने या सामन्यासाठी एक मजबूत प्लेइंग 11 खेळवेल यात काही शंका नाही. आरसीबी प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करण्याची शक्यता आहे. जोश हेझलवूड खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. क्वॉलिफायर फेरीसाठी सज्ज असल्याचं फलंदाज प्रशिक्षक दिनेश कार्तिक याने सांगितलं आहे. मागच्या काही सामन्यात त्याची उणीव भासली होती. नुवान तुषाराच्या जागी त्याची प्लेइंग 11 मध्ये वर्णी लागू शकते.

लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी दुसरा खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असेल. टिम डेव्हिड जर पूर्णपणे बरा झाला असेल तर त्याची जागा घेईल. पण टिम डेव्हिड तंदुरुस्त नसेल तर टिम सेफर्टला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण लियाम लिव्हिंगस्टोनने आरसीबीसाठी 8 सामने खेळले आहेत आणि यावेळी त्याने फक्त 87 धावा केल्या आहेत. लखनौ विरुद्ध टॉप 2 साठी झालेल्या लढतीत तर लियामने पहिल्या चेंडूवर विकेट टाकली. त्यामुळे लियामला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात येईल हे निश्चित आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात खेळलेले उर्वरित खेळाडू पंजाब किंग्स विरुद्ध खेळतील.

विराट कोहली आणि फिल साल्ट हे सलामीवीर असतील. जर टिम डेव्हिड तंदुरुस्त नसेल तर टिम सेफर्टला तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि मयंक अग्रवाल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जितेश शर्मा फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. सहाव्या किंवा गरजेनुसार वर देखील फलंदाजीला उतरू शकते. कृणाल पांड्या सातव्या क्रमांकावर दिसेल, तर रोमारियो शेफर्ड तळाशी येत मोठी फटकेबाजी करू शकतो. जोश हेझलवूड, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाज म्हणून मैदानात उतरतील हे निश्चित आहे.

कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.