IPL 2026 : 10 संघ आणि 10 खेळाडू, आयपीएलमधील सर्वात युवा क्रिकेटर कोण?
IPL 2026 Youngest Players : आयपीएलच्या 19 व्या मोसमातील सर्वात युवा खेळाडूचं वय किती? वैभव सूर्यवंशी की आणखी कुणी? सर्वात लहान कोण? जाणून घ्या.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान एकूण 4 डबल हेडर सामने होणार आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेद्वारे स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय. आयपीएल म्हणजेच युवांची स्पर्धा असं समीकरण आहे. या निमित्ताने 19 व्या मोसमात खेळणाऱ्या 10 संघांमधील 10 युवा खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. तसेच या खेळाडूंचं पदार्पणावेळेसवय किती होतं? हे समजून घेऊयात.
सर्वात युवा खेळाडू कोण?
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू आहे. वैभवने वयाच्या 14 वर्ष 23 व्या दिवशी आयपीएल पदार्पण केलं होतं. वैभवने राजस्थान रॉयल्सकडून 2025 साली क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत टी 20 क्रिकेट लीगमध्ये पदार्पण केलं होतं.
प्रयास रे बर्मन
प्रयास रे बर्मन हा आरसीबीकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता. प्रयासने 16 वर्ष 157 व्या दिवशी पदार्पण केलं होतं.
मुजीब उर रहमान
अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पंजाब किंग्सकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे. पंजाब किंग्स टीम मॅनेजमेंटने मुजीबला 17 वर्ष 11 व्या दिवशी पदार्पणाची संधी दिली होती.
प्रदीप सांगवान
प्रदीप सांगवान हा दिल्ली कॅपिट्ल्सचा सर्वात युवा खेळाडू आहे. प्रदीपने 17 वर्ष 179 व्या दिवशी या स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता.
आयुष म्हात्रे
आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू आहे. आयुषने 17 वर्ष 278 व्या दिवशी पदार्पण केलं होतं.
क्वेना मफाका
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका हा मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे. क्वेनाने 17 वर्ष 278 व्या दिवशी डेब्यू केला होता.
मनदीप सिंह
मनदीप सिंह केकेआरसाठी आयपीएल पदार्पण करणारा युवा खेळाडू आहे. मनदीपने 18 वर्ष 94 व्या दिवशी आयपीएलमध्ये पाऊल ठेवलं होतं.
नूर अहमद
नूर अहमद गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे. नूरने 18 वर्ष आणि 103 व्या दिवशी आयपीएल स्पर्धेत डेब्यू केलं होतं.
राशिद खान
सनरायजर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू हा मान राशिद खान याने मिळवला होता. राशिदने 18 वर्ष 197 व्या दिवशी आयपीएल डेब्यू केलं होतं.
अर्शीन कुलकर्णी
लखनौ सुपर जायंट्ससाठी अर्शीन कुलकर्णी याने सर्वात कमी वयात आयपीएल पदार्पण केलं होतं सोलापुरच्या या खेळाडूने वयाच्या 19 वर्ष आणि 75 व्या दिवशी पदार्पण केलं होतं.