DC vs KKR Toss : केकेआरचा बॉलिंगचा निर्णय, दिल्लीला किती धावांवर रोखणार?
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, Toss and Playing 11 : दिल्ली कॅपिट्ल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. पाहुण्या केकेआरने या सामन्यात यजमान दिल्लीला बॅटिंगसाठी बोलावलंय.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 51 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचा हा 11वा आणि केकेआरचा 10 वा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. कोलकाताने टॉस जिंकला. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला घरच्या मैदानात बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता दिल्लीची सेना केकेआर विरुद्ध किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट काय?
कोलकाताने पहिल्या आणि सलग 6 पराभवानंतर जोरदार कमबॅक केलंय. केकेआरने सलग 3 सामने जिंकलेत. केकेआरने आता दहाव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दिल्लीने 2 बदल केले आहेत. टी नटराजन आणि करुण नायर या दोघांच्या जागी मुकेश कुमार आणि विपराज निगमला संधी देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 19 व्या मोसमातील हा सहावा सामना आहे. याआधी 5 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा एकदा विजय झाला आहे. तर चेजिंग करणाऱ्या संघाने 4 वेळा मैदान मारलं आहे.
दिल्ली प्रतिक्षा संपवणार?
दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्सला 2024 पासून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. उभयसंघात 2024 पासून एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या तिन्ही सामन्यांत दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात दिल्ली कोलकाता विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨Toss update from Delhi🚨@kkriders won the toss and elected to bowl first against @DelhiCapitals
Updates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR pic.twitter.com/Nd38qv8r3f
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : पथुम निसांका, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी आणि मुकेश कुमार.