AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका षटकात 6 चौकार! पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सकडून केली वसुली, 26 चेंडूत 76 धावांची खेळी

आयपीएल 2026 स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलचा झंझावात पाहायला मिळाला. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने आक्रमण केलं.

एका षटकात 6 चौकार! पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सकडून केली वसुली, 26 चेंडूत 76 धावांची खेळी
एका षटकात 6 चौकार! पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सकडून केली वसुली, 26 चेंडूत 76 धावांची खेळीImage Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Apr 25, 2026 | 7:02 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 2 गडी गमवून 264 धावा केल्या. विजयासाठी बलाढ्य 265 धावांचं आव्हान पंजाब किंग्ससमोर ठेवलं. या धावांचा पाठलाग करणं तसं अवघड काम होतं. पण पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आक्रमक सुरूवात केली. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची पहिल्या चेंडूपासून धुलाई सुरू केली. प्रभसिमरन सिंग तर सुसाट सुटला होता. गोलंदाजांना कोणतीही दया माया न दाखवता आक्रमण सुरू केलं. प्रभसिमरन सिंगने दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेत 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यापूर्वी 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कारनामा केला.

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रभसिमरन सिंगच्या 17 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. पावरप्लेच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या षटकात त्याला स्ट्राईक मिळाली. मुकेश कुमार गोलंदाजीसाठी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि अर्धशतक पूर्ण केलं. पण प्रभसिमरन सिंग इतक्यावरच थांबला नाही. त्याचा झंझावात पुढेही सुरू राहिला. त्याने पुढच्या पाच चेंडूंवर पाच चौकार मारले. त्याने या षटकाच्या सहा चेंडूवर सहा चौकार मारून एक विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला.

आयपीएल 2012 मध्ये अजिंक्य रहाणेने श्रीनाथ अरविंदला सहा चेंडूत सहा चौकार मारले होते. त्यानंतर 2021 मध्ये पृथ्वी शॉने शिवम मावीला सहा चेंडूत सहा चौकार मारून या विक्रमाची पुनरावृत्ती केली. आता प्रभसिमरन सिंगने आयपीएल स्पर्धेत तिसऱ्यांदा हा कारनामा केला. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा चौकार मारले. प्रभसिमरन सिंग 26 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार मारत 76 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 292.31 चा होता. पण कुलदीप यादवच्या फिरकीवर पायचीत होत तंबूत परतला.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल