AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, GT vs PBKS: गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं

आयपीएल 2026 स्पर्धेतील 46वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. हा सामना गुजरात टायटन्सने 4 गडी राखून जिंकला. यासह प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे.

IPL 2026, GT vs PBKS: गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 03, 2026 | 11:25 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 46व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सला गडी राखून मात दिली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला. कारण पंजाब किंग्सला 20 षटकात 163 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सने पूर्ण केलं.  गुजरात टायटनस्ने 19.5 षटकात 6 गडी गमवून विजयी धावा गाठल्या. या विजयासह गुजरात टायटन्सच्या खात्यात 12 गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होणार असल्याचं दिसत आहे.

गुजरात टायटन्सचा डाव

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेल्या 164 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरूवात निराशाजनक झाली. शुबमन गिल 4 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे पावरप्लेमध्ये गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला. गुजरातने पावरप्लेच्या सहा षटकात 1 गडी गमवून 58 धावा केल्या. जोस बटलरच्या रुपाने दुसरा धक्का बसला. 22 चेंडूत 26 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या निशांत सिंधूकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याचा डावही 15 धावांवर आटोपला. साई सुदर्शन 41 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारून 57 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघावर शेवटच्या क्षणी दडपण आलं. राहुल तेवतियाही फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर 8 चेंडूत 12 धावांची गरज असताना जेसन होल्डर बाद झाला. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं.  2 चेंडूत 3 धावांची गरज असताना वॉशिंंग्टन सुंदरने षटकार मारला.

पंजाब किंग्सचा डाव

पंजाब किंग्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. प्रियांश आर्य 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला कूपर कोन्नोली खातंही खोलू शकला नाही. प्रभसिमरन सिंग 15 धावांवर तंबूत परतला. तर नेहल वढेरा गोल्लडन डकवर बाद झाला. त्यामुळे पंजाबचा संघ पुरता बॅकफूटवर गेला. पावरप्लेमध्ये 35 धावांवर 4 गडी गमाववले होते. त्यानंतर षटकात श्रेयस अय्यरची विकेट गेली. 19 धावा करून बाद झाला. त्यामुळे पंजाबचा संघ अडचणीत आला होता. पण सूर्यांश शेडगे आणि मार्कस स्टोयनिस यांनी डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. सूर्यांश 29 चेंडूत 57 धावा करून बाद झाल. त्यानंतर मार्कस स्टोयनिस 40 करून तंबूत परतला. झेव्हियर बार्टलेटला आला तसा तंबूत पाठवला. त्याला खातही खोलता आलं नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल