AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 संपताच शुबमन गिल लग्नाच्या बेडीत अडकणार? स्पर्धेदरम्यान स्वत:च केला खुलासा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 46वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला एका विचित्र प्रश्नाला सामोरं जावं लागलं. ब्रॉडकास्टर डॅनी मोरिसनने त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला आणि...

आयपीएल 2026 संपताच शुबमन गिल लग्नाच्या बेडीत अडकणार? स्पर्धेदरम्यान स्वत:च केला खुलासा
आयपीएल 2026 संपताच शुबमन गिल लग्नाच्या बेडीत अडकणार? स्पर्धेदरम्यान स्वत:च केला खुलासाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 03, 2026 | 8:49 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान कर्णधार शुबमन गिलला पुन्हा एकदा लय सापडली आहे. सुरूवातीच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या पदरी पराभव पडल्यानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आला आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाची स्तुती होताना दिसत आहे. असं असताना शुबमन गिलच्या खासगी आयुष्यात काय होतं? याकडे त्याच्या चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. पण त्याने अनेकदा वैयक्तिक आयुष्याबाबत उडालेल्या अफवाना वेसण घातलं आहे. तसेच काही अफवा धुडकावून लावल्या आहेत. पण आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याला विचित्र प्रश्नाला सामोरं जावं लागलं. खरं तर त्याला असं काही अपेक्षित नव्हतं. पण त्याने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि विषय संपवला. नाणेफेकीवेळी शुबमन गिलला ब्रॉडकास्टर डॅनी मोरिसन याने लग्नाबाबत प्रश्न विचारलं. त्याचं प्रश्नाचं उत्तर गिलने एका शब्दात दिलं.

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. त्यानंतर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोरिसनसोबत त्याने संवाद साधला. तेव्हा अचानक मोरिसनने लग्नाची गुगली टाकली. त्याने विचारलं की, गिल आता लग्नाची घंटा वाजू लागली आहे का? आम्हाला माहिती असायला हवं का? या प्रश्नानंतर शुबमन गिल ब्लँक झाला आणि काही क्षणात म्हणाला की, ‘नाही, काही नाही.’ मॉरिसन पुढे म्हणाला की, तुम्हाला भेटून आनंद झाला. त्यानंतर मोरिसन पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे वळला. पण मोरिसनच्या या प्रश्नाने गिलच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव दिसेल. कारण या अनपेक्षित प्रश्नाने त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.

डॅनी मोरिसनने शुबमन गिलला असा प्रश्न विचारण्याची ही काय पहिली वेळ नाही. मागच्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये मॉरिसनने गिलला असाच लग्नाबाबत प्रश्न विचारल होता. तेव्हा शुबमन गिलने सांगितंल की, गेल्या तीन वर्षांपासून सिंगल आहे. क्रिकेटवर आता पूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे आणि रिलेशनशिपसाठी वेळ नाही. काही अफवा माझ्या नावाने पसरल्या आहेत. पण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.

शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आता दहावा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होत आहे. या सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकेल. त्यामुळे या सामन्यात काय होतं याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!