IPL 2026 : MS धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन? माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ

MS Dhoni : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वर्षातून फक्त आयपीएलमध्येच खेळतो. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र आता हा त्याचा अखेरचा सीजन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL 2026 : MS धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन? माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ
MS Dhoni
Image Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2026 | 6:38 PM

टी 20 वर्ल्डकपनंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता सुमारे दोन आठवडेच शिल्लक आहेत. यंदाच्याही आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीचे चाहते त्याला मैदानावर खेळताना पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वर्षातून फक्त आयपीएलमध्येच खेळतो. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरवर्षी चाहत्यांना हीच चिंता असते की कदाचित हा धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन असेल. 2026 मध्येही चाहत्यांना असंच वाटत आहे. अशातच आता माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने धोनीच्या भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धोनी शेवटचा आयपीएल सीजन खेळणार का?

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने जिओ हॉटस्टारवरील एका शो मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे. इरफान पठाणच्या मते, खेळाडू म्हणून धोनीचे हे कदाचित शेवटचे वर्ष असू शकते. पुढे बोलताना इरफानने म्हटले की, ‘चेन्नई सुपर किंग्सची टीम धोनीशिवाय अपूर्ण आहे. कदाचित आपण त्यांना शेवटच्या वेळेस पिवळ्या जर्सीत पाहू. आयपीएल जवळ आल्यामुळे आता पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी मैदानावर खेळताना दिसणार आहे. यावेळी तो पूर्णपणे तयार आणि फिट दिसत आहे.’

धोनी तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करणार – पठाण

इरफान पठाणने म्हटले की, ‘आयपीएल 2026 दरम्यान धोनी सीएसकेसाठी नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करेल. या सिझनमध्ये धोनी संघाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. तो किती सामने खेळणार हे मला माहीत नाही, पण ड्रेसिंग रूममध्ये त्यांची उपस्थिती संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. संजू सॅमसनलाही याचा फायदा होईल, कारण तो लीडरशिप ग्रुपचा भाग असेल.’

चेन्नईचा कर्णधार कोण असेल?

चेन्नईच्या कर्णधार पदावर बोलताना इरफान पठाण म्हणाला की, ऋतुराज हा कर्णधार असेल, पण एक गृप म्हणून दोन-तीन खेळाडूंना भविष्यासाठी तयार केले जाईल. या प्रक्रियेत धोनी मदत करेल. त्याची फिटनेस आणि फलंदाजीचा क्रम याबाबत अजूनही प्रश्न आहे. मात्र CSK व्यवस्थापन टप्प्याटप्प्याने निर्णय घेईल आणि धोनीला सहाव्या आयपीएल ट्रॉफीसह शानदार निरोप देण्याचा प्रयत्न करेल.’

 

Follow Us