AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : सीजन सुरु होण्याआधी हार्दिक-रोहित मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न, अखेर मुंबई इंडियन्सला द्यावं लागलं स्पष्टीकरण

IPL 2026 Mumbai Indians : रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या दोघे मुंबई इंडियन्सचं प्रमुख अंग आहेत. हार्दिक 2024 पासून कॅप्टन आहे. रोहितने यशस्वीरित्या मुंबई इंडियन्सच कर्णधारपद संभाळलं होतं. आता हार्दिक कॅप्टन आहे.

IPL 2026 : सीजन सुरु होण्याआधी हार्दिक-रोहित मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न, अखेर मुंबई इंडियन्सला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Hardik Pandya-Rohit SharmaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 14, 2026 | 2:38 PM
Share

IPL 2026 Mumbai Indians : आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता काही दिवसच उरलेत. 28 मार्च रोजी या लीगचा 19 वा सीजन चालू होईल. या सीजनसाठी सर्वच टीम्सनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने सुरुवातीच्या सामन्यांचं शेड्यूलही जारी केलय. या दरम्यान पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक हैराण करणारी बातमी समोर आलीय. सीजन सुरु होण्याआधी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिलाय असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. आता यावर मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया आली आहे.

आयपीएल 2026 आधी मुंबई इंडियन्सबद्दल एक अफवा पसरली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एका युजरने असा दावा केलेला की, “हार्दिकने टीम मॅनेजमेंटला स्पष्टपणे सांगितलय की, यावेळी जर रोहित शर्माने धावा केल्या नाहीत, तर सहन करणार नाही” पोस्टमधील दाव्यानुसार “मॅनेजमेंट मागच्या 10-12 वर्षातील रोहितच्या प्रदर्शनावर नाराज आहे. कारण तो प्रत्येक सीजनमध्ये 200-300 धावाच करु शकतो. ते सुद्धा 120 च्या स्ट्राइक रेटने. पण टीममधील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे”

फक्त दोन शब्दात उत्तर

सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने पसरली आणि क्रिकेट फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनली. रोहित शर्माचा फलंदाजीचा फॉर्म मागच्या काही काळापासून चिंतेचा विषय आहे. IPL 2013 च्या सीजननंतर त्याने कुठल्याही सीजनमध्ये 500 धावा केलेल्या नाहीत. मागच्या सीजनमध्ये त्याने 15 सामन्यात 418 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सने ही पोस्ट फेटाळून लावली आहे. टीमने अधिकृत सोशल मिडिया हँडलवर फक्त दोन शब्दात उत्तर दिलं, ‘काही ही’. त्यांनी हार्दिक पंड्याचा एक मजेदार GIF पोस्ट केला. त्यावरुन सोशल मीडियाची ही पोस्ट तथ्यहीन असल्याचं स्पष्ट झालं.

IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी?

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या दोघे मुंबई इंडियन्सचं प्रमुख अंग आहेत. हार्दिक 2024 पासून कॅप्टन आहे. रोहितने यशस्वीरित्या मुंबई इंडियन्सच कर्णधारपद संभाळलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळी आयपीएल ट्रॉफी जिंकली. दोघांनी मिळून टीमला पुन्हा एकदा विजेता बनवावं अशी फॅन्सची इच्छा आहे. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स 29 मार्चला आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यांचा पहिला सामना KKR विरुद्ध होणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!