AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणसोबत संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, थेट 27 राज्यांमध्ये…, नागरिक भयभीत, जगभरात मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर आली असून, या बातमीमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! इराणसोबत संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, थेट 27 राज्यांमध्ये..., नागरिक भयभीत, जगभरात मोठी खळबळ
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 8:03 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. यावर्षी 28 फेब्रुवारी रोजी इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. इस्त्रायलकडून इराणवर पहिला हल्ला करण्यात आला, त्यानंतर मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले करण्यात आले, इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या तर दुसरीकडे इराणने देखील मध्य पूर्वेतील ज्या -ज्या देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं होते, त्या-त्या ठिकाणी भीषण हल्ले केले तसेच इ्स्त्रालयवर देखील ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले. दरम्यान त्यानंतर युद्धाच्या 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला.

मात्र युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ला करण्यात येत आहे. दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर येत आहे.

अमेरिकेमध्ये काँडिडा ऑरिस नावाच्या बुरशीजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे, या आजारामुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. तब्बल 27 राज्यांमध्ये हा आजार तीव्र वेगाने पसरला असून, या आजारामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत. हा बुरशीजन्य आजार औषधोपचारांना प्रतिसाद देत नसल्याने चिंता अधिक प्रमाणात वाढली आहे. हा आजार अनेक इन्फेक्शनचं कारण ठरत असल्यामुळे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशनने देखील या आजाराची गंभीर दखल घेतली असून, ‘क्रिटिकल-प्रायोरिटी फंगल पॅथॉजन’ अत्यंत धोकादायक आजार असं या आजाराचं वर्गीकरण करण्यात आलं आहे.

1996 मध्ये पहिल्यांदा या आजाराचा शोध लागला होता. हा आजार खूप घातक आहे, याचं कारण म्हणजे हा आजार तुम्ही एकमेकांच्या संर्पकात आल्यास लगेच या आजाराची लागण होते. तसेच हा आजार असलेल्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूला जरी स्पर्श केला तरी त्या वस्तूवर  ही बुरशी दीर्घकाळ टिकवून राहते आणि त्यामुळे इतर व्यक्तींना देखील हा आजार होण्याची शक्यता असते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल